Desi Jugaad: ट्रेनमध्ये झोपायला सीट नसल्याने काकांनी लढवली अजब शक्कल, फोटो तुफान व्हायरल…

भारतात कोणत्याही प्रकारचं जुगाड करण्यासाठी अनेक मास्टर्स लोक आहेत. मग ती कोणतीही असो..भारतीय लोक त्यावर उपाय शोधतात. आता काकांनाच बघा ना ट्रेनमध्ये झोपायला न मिळाल्याने त्यांनी अजब शक्कल लढवली आहे. उत्तर प्रदेशांच्या एडीजींनी एक फोटो शेअर केला आहे. त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून अनेक लोकं काकांच्या या जुगाडाला आकर्षित झाले आहेत.

या फोटोत काही प्रवासी ट्रेनमध्ये प्रवास करताना दिसत आहेत. परंतु त्यातला एक प्रवासी वेगळ्या पद्धतीने झोपलेला दिसत आहे. वास्तविक देसी जुगाडच्या सहाय्याने त्या प्रवाशाचे डोके खाली पडण्यापासून वाचत आहे. जेव्हा आपण बसून प्रवास करतो. त्यावेळी आपली मान किंवा डोके एका बाजूला होते. त्यामुळे कधी कधी आपल्याला व्यवस्थित झोपही लागत नाही. आपण खाडकन झोपेतून जागा होतो. त्यामुळे अशा गर्दीत तुम्ही कोणाचीही मदत घेऊ शकत नाही. त्यामुळे काकांनी एक डोक्याला कपडा बांधून ट्रेनवरील वरच्या सिटवर देखील बांधला आहे. त्यामुळे त्यांची मान किंवा डोके इकडे-तिकडे न होता, ते शांतपणे झोपू शकतात.

दरम्यान, @navsekera या ट्विटर युजर्सने हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. इनक्रेडिबल इंडिया अशा प्रकारचा हॅशटॅग देखील देण्यात आला आहे. या फोटोला ३७ हजारांहून लाईक्स आणि २ हजारांहून अधिक कॉमेंट्स मिळाले आहेत. तसेच युझर्सकडून त्यांचे मतही मांडण्यात आले आहेत.


हेही वाचा : मुन्नाभाईच्या नावाने महाराष्ट्राला मामू मिळाले, दीपाली सय्यदांचा राज ठाकरेंना टोला