घरताज्या घडामोडीVishal Garg Apologises: zoom call कॉलवर ९०० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करणाऱ्या CEO ने...

Vishal Garg Apologises: zoom call कॉलवर ९०० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करणाऱ्या CEO ने मागितली माफी, म्हणाले….

Subscribe

काही दिवसांपूर्वी तीन मिनिटांच्या झूम कॉलवर कंपनीच्या ९०० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणारे भारतीय वंशाचे सीईओ विशाल गर्ग यांनी अखेर माफी मागितली आहे. त्यांनी एक पत्र लिहून कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे. ते म्हणाले की, अशाप्रकारे कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेर काढणे ही पद्धत चुकीची होती. दरम्यान अशा प्रकारे कर्मचाऱ्यांची हकलपट्टी केल्यामुळे सीईओ विशाल गर्ग यांच्यावर जोरदार टीका केली होती.

सीईओला झाला पश्चाताप

अमेरिकन कंपनी बेटर डॉट कॉमचे (Better.com) सीईओ विशाल गर्ग यांनी झूमवर ऑनलाईन कॉल दरम्यान ९०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याच्या निर्णयामुळे त्यांना पश्चाताप झाला आहे. विशाल गर्ग यांनी याबद्दल पत्र लिहून कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे. या पत्रात विशाल यांनी आपली चूक मान्य करत म्हटले की, त्यांची ही पद्धत चुकीची होती आणि त्यांच्याकडून ही मोठी चूक झाली आहे.

- Advertisement -

तसेच पत्रात पुढे विशाल गर्ग यांनी म्हटले की, ज्यांनी कंपनीसाठी त्यांचे अमूल्य योगदान दिले आहे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात मी अयशस्वी राहिलो आहे. मी नोकरी सोडण्याच्या माझ्या निर्णयावर अजूनही ठाम असलो तरी मी ज्या पद्धतीने कर्मचाऱ्यांवर अंमलबजावणी केली ती चुकीची होती. आता मला जाणवले की, ज्याप्रकारे कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आणि त्याची माहिती दिली, त्यामुळे परिस्थिती आणखीन बिघडली आहे.

दरम्यान माहितीनुसार झूम कॉलवर अशा प्रकारे नोकरीवरून काढण्यात येणार असल्याची माहिती कर्मचाऱ्यांना नव्हती. सीईओ विशाल गर्ग यांनी अवघ्या तीन मिनिटांच्या झूम कॉलवर तोंडी फर्मान देऊन शेकडो लोकांना बेरोजगार केले होते.

- Advertisement -

एका व्हायरल व्हिडिओमध्ये नोकरीवरून काढलेल्या कर्मचाऱ्याने सांगितले की, झूम मिटिंग सुरू होताच कंपनीचे सीईओ विशाल गर्ग यांनी सर्व कर्मचाऱ्यांना इशारा दिला की, ते एक वाईट बातमी घेऊन आले आहेत. ते एका नशीब नसलेल्या समुहाचा भाग आहेत, जर तुम्ही या कॉलवर असाल तर तुम्हालाही नोकरीवरून काढले जात आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात येत आहे.


हेही वाचा – अयोध्या निकालानंतर सहकारी न्यायमूर्तींसोबत केला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये डिनर अन् वाईन पार्टी! – रंजन गोगोई


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -