Eco friendly bappa Competition
घर क्राइम 2011 ते 2021 दरम्यान विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण 70 टक्यांनी वाढले; NCRB ची...

2011 ते 2021 दरम्यान विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण 70 टक्यांनी वाढले; NCRB ची आकडेवारी

Subscribe

नवी दिल्ली : राष्ट्रीय अपराध रिकॉर्ड ब्यूरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार, 2011 ते 2021 दरम्यान देशामध्ये आत्महत्येच्या (Suicide) प्रमाणात 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तीन दिवसांपूर्वी म्हणजेच रविवारी (10 सप्टेंबर) जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस साजरा करत असताना कोटा (Kota) आणि राजस्थानसह (Rajasthan) इतर ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आत्महत्येशी देश झगडत असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. भारताचे एज्युकेशन हब असणाऱ्या राजस्थानच्या कोटामध्ये 2015 पासून आजपर्यंत सर्वाधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. (Between 2011 and 2021 student suicide rates increased by 70 percent Statistics from NCRB)

2011 पासून भारतात विद्यार्थी आत्महत्यांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. याव्यतिरिक्त, देशातील एकूण आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांमधील विद्यार्थ्यांच्या टक्केवारीतही वाढ झाली आहे. 2011 पासून विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमध्ये 2.3 टक्क्यांनी वाढ होऊन 2021 मध्ये 8 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. एनसीआरबीच्या डेटानुसार 2021 मध्ये एकूण 13,089 विद्यार्थ्यांचा आत्महत्येमुळे मृत्यू झाला आहे, तर 2011 मध्ये 7,696 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. त्यामुळे मागील दहा वर्षात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळते.

- Advertisement -

हेही वाचा – राम मंदिर बांधकामाच्या खोदकामात सापडले प्राचीन शिलालेख; मूर्ती, स्तंभाचाही समावेश

धक्कादायक बाब म्हणजे 2020 मध्ये विद्यार्थी आत्महत्यांच्या संख्येत आणि प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. एनसीआरबीच्या अपघाती मृत्यू आणि देशातील आत्महत्या (ADSI) अहवाल विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट करत नसले तरी ते वयोगटाच्या आधारे तपशील समोर आला आहे. इतर किंवा अज्ञात कारणे वगळता 2021 च्या ADSI अहवालातील नोंदीनुसार 18 वर्षाखालील व्यक्तींमध्ये आत्महत्येची सर्वात सामान्य कारणे, कौटुंबिक समस्या (30 टक्के प्रकरणे), प्रेम प्रकरण (14 टक्के), आजार (13 टक्के) आणि परीक्षेत अपयश (8 टक्के) ही आहेत.

मानसिक आरोग्यामुळे आत्महत्येचे प्रमाण 58 टक्के

- Advertisement -

आजार श्रेणीमध्ये मानसिक आरोग्य समस्यांमुळे 58 टक्के लोकांनी आत्महत्या केली आहे. 2011 ते 2021 पर्यंतचा समोर आलेल्या डेटानुसार देशातील सर्व वयोगटांमध्ये परीक्षेत अपयश मिळाल्यामुळे आत्महत्यांचे सरासरी मूल्य 1.8 टक्के होते आणि सरासरी 1.77 टक्के होती. 2021 मध्ये परीक्षेत अपयश आल्यामुळे 1,673 लोकांनी आत्महत्या केली आहे. ज्यात 991 पुरुष आणि 682 महिलांचा मृत्यू झाला आहे. उल्लेखनीय म्हणजे 2021 मध्ये परीक्षेत अपयश आल्यामुळे एकही ट्रान्सजेंडरने आत्महत्या केलेली नाही.

हेही वाचा – US : गाडीला धडकून भारतीय वंशाच्या महिलेचा मृत्यू झाल्यावर पोलिसांकडून चेष्टा; चौकशी सुरू

महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये आत्महत्येचे प्रमाण जास्त

एका विश्लेषणानुसार, महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे. 18 वर्षांखालील तरुण स्त्रियांमध्ये आत्महत्या दर समान वयोगटातील त्यांच्या पुरुष समकक्षांपेक्षा जास्त आहेत. 2017 ते 2021 दरम्यान ट्रान्सजेंडर व्यक्तींमध्ये आत्महत्येच्या 94 प्रकरणांची नोंद झाली आहे. समोर आलेल्या डेटानुसार 18 ते 30 वर्षे वयोगटातील ट्रान्सजेंडर समुदायामध्ये आत्महत्येच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. 2017 पासून किमान 62 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

पाच राज्यांमध्ये सर्वाधिक आत्महत्या

एनसीआरबीच्या आकड्यांवरून देशातील गंभीर स्थिती समोर आली आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, मध्य प्रदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक ही राज्ये आत्महत्येमध्ये देशात पुढे आहेत. देशातील एकूण 50.4 टक्के प्रकरणांची या पाच राज्यांमध्ये नोंद झाली आहे.

- Advertisment -