घरदेश-विदेशसावधान ! परफ्यूमच्या बाटलीत लपवलेला असू शकतो बाॅम्ब

सावधान ! परफ्यूमच्या बाटलीत लपवलेला असू शकतो बाॅम्ब

Subscribe

नरवाल येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी आरिफला मागील महिन्यात 21 जानेवारीला अटक केली होती. तेव्हा पोलिसांनी त्याच्याकडून एक विशेष बॉम्ब जप्त केला होता. हा बॉम्ब परफ्युम बॉटलच्या आकारातील होता. ज्यामुळे याला परफ्युम बॉम्ब असे म्हंटले जाऊ लागले.

21 जानेवारीला जम्मू-काश्मीर पोलिसांनी नरवाल बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आरिफला ताब्यात घेतले. यावेळी आरिफकडून जम्मू-काश्मीर पोलिसांनी एक वेगळ्याच प्रकारचा बॉम्ब जप्त केला होता. हा बॉम्ब परफ्युमच्या बॉटलसारखा दिसण्यास होता. ज्यामुळे या बॉम्बला परफ्युम बॉम्ब असे म्हटले जाऊ लागले. त्यामुळे आता दहशतवाद्यांनी बॉम्ब बनविण्यासाठी नवीन शक्कल लढवल्याने परफ्युमबाबत लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंग यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असताना सांगितले की, आम्ही पहिल्यांदाच अशा प्रकारचा बॉम्ब जप्त केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्येच नव्हे तर देशभरात पहिल्यांदाच परफ्यूम आयईडी स्फोटक जप्त करण्यात आले आहे. तसेच त्यांनी सांगितले की, लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी 20 जानेवारी रोजी नरवालमध्ये बॉम्ब लावले होते. 21 जानेवारीला 20 मिनिटांच्या अंतराने दोन स्फोट झाले. पहिल्या ठिकाणी झालेल्या स्फोटात 9 जण जखमी झाले होते.

- Advertisement -

डीजीपी दिलबाग सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधीही परफ्यूम बॉम्बबद्दल माहिती मिळाली होती. परंतु कधीही तो सापडला नाही. हा बॉम्ब रिकाम्या परफ्युमच्या बाटल्या आणि इम्प्रोव्हाईज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईसच्या मदतीने बनवण्यात येतो. म्हणूनच त्याला परफ्यूम बॉम्ब असे म्हणतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या परफ्युम बॉम्बला कोणी दाबले किंवा त्याचे झाकण उघडले की याचा लगेच स्फोट होतो. आमची विशेष टीम परफ्यूम आयईडी स्फोटकाची अधिक तपासणी करत आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

परफ्यूम बॉम्ब कसा बनवला जातो ?
जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरवाल स्फोटात केवळ परफ्यूम बॉम्बचा वापर करण्यात आला होता. आरिफने यापूर्वी शास्त्रीनगर आणि कटरा येथे बसमध्ये स्फोट घडवून आणले होते. जम्मू-काश्मीरमध्ये तो 3 वर्षांपासून पाकिस्तानचा हस्तक म्हणून काम करत आहे. पोलिसांनी सांगितले की, परफ्यूम इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस तयार करण्यासाठी दहशतवादी परफ्यूमची रिकामी बाटली घेतात आणि त्यात स्फोटक यंत्र ठेवतात. लोकांना या बॉम्बबद्दल फारशी माहिती नाही. त्यामुळे दहशतवाद्यांना ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे आणि तो बॉम्ब कोठेही लावणे खूप सोपे असते.

- Advertisement -

हेही वाचा – पीएम मोदींच्या लोकप्रियतेत वाढ, २२ देशांच्या दिग्गज नेत्यांना टाकलं मागे

परफ्यूम बॉम्बचे झाकण दाबल्यावर किंवा उघडल्यावर आयईडी सक्रिय होतो. यानंतर त्याचा स्फोट होतो. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्याचा परिणाम व्यापक आहे. तो इतका प्राणघातक आहे की, या बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर या ठिकाणी असलेल्या लोकांच्या चिंधड्या होऊ शकतात. परफ्यूम बॉम्ब पाहून त्यात बॉम्ब असू शकतो हे सांगणे जवळपास अशक्य आहे.

परफ्यूम बॉम्बबाबत शेवटचा इशारा नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरोकडून 2011 मध्ये देण्यात आली होती. यानंतर मुंबई विमानतळावरील प्रत्येक प्रवाशाला त्यांच्याजवळ असेलल्या परफ्यूमच्या बॉटलची पूर्णत: तपासणी केल्यानंतरच पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली होती. त्याच वर्षी कोलकाता पोलिसांनी संपूर्ण शहरातून परफ्यूमच्या बाटल्या गोळा केल्या होत्या. यासोबतच कोलकाता विमानतळ आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -