घरदेश-विदेशकोरोना झालं, वादळ झालं आता ६ जूनला येणार नवं संकट! नासाने दिला...

कोरोना झालं, वादळ झालं आता ६ जूनला येणार नवं संकट! नासाने दिला इशारा

Subscribe

पृथ्वीसाठी धोकादायक असणारा अ‍ॅस्टेरॉईड हा लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार असल्याचा नासाने दिला इशारा

जगभरासह देशात कोरोना व्हायरसचा धुमाकूळ सुरू असताना ३ जून रोजी उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीवर ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा चांगलाचा कहर बघायला मिळाला. मात्र आता कोरोना व्हायरसचं संकट असताना त्यानंतर निसर्ग वादळाने घातलेल्या थैमानानंतर ६ जून रोजी अस्मानी संकट येणार असल्याचा इशारा नासाकडून देण्यात आला आहे.

६ जून रोजी लघूग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार

अमेरिकेमधील अंतराळ संशोधन संस्था असणाऱ्या नासाने पृथ्वीसाठी धोकादायक असणारा अ‍ॅस्टेरॉईड हा लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार असल्याचा इशारा दिला आहे. तसेच नासानेच आपल्या वेबसाईटवरून असे सांगितले की, जून महिन्यात हा लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार आहे. या लघुग्रहाचे नाव ‘२००२ एनएच फोर’ असे असल्याचे नासाच्या वेबसाईटवर म्हटले आहे. ६ जून रोजी हा लघूग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार असून त्याचा व्यास २५० ते ५७० मीटर इतका असल्याचे देखील नासाकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -
६ जूनला सायंकाळी ६.१७ मिनिटांनी पृथ्वीच्या जवळून जाणार

नासाने दिलेल्या माहितीनुसार, हा लघुग्रह ईडीटी (युरोपीयन वेळेनुसार) १२ वाजता म्हणजेच भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६ वाजून १७ मिनिटांनी पृथ्वीच्या सर्वात जवळून जाणार आहे. अमेरिकेमधील काही प्रसारमाध्यमांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, ‘२००२ एनएच फोर’ हा लघुग्रह पृथ्वीपासून ५.१ दशलक्ष किमी दूरून जाणारा असल्याचा अंदाज नासाने व्यक्त केला आहे.

पृथ्वीजवळून जाताना या लघुग्रहाचा वेग ११.१० किमी प्रती सेकंद इतका असणार आहे. नासाच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व खगोलीय वस्तूंचे वर्गीकरण हे पृथ्वीच्या दृष्टीने संभाव्य धोकादायक ठरणाऱ्या अंतराळातील वस्तूंमध्ये करण्यात आले असून संभाव्य धोकादायक ठरणाऱ्या लघुग्रहांमध्ये २००२ एनएच फोर या लघुग्रहाचा देखील समावेश होतो.

- Advertisement -

दरम्यान, अंतराळामध्ये पृथ्वीच्या आजूबाजूच्या परिसरात १४० मीटरपेक्षा अधिक मोठा व्यास असणारे ८ हजारापेक्षा जास्त लघुग्रह आहेत. हे सर्व लघुग्रह ७ दशलक्ष किमीपर्यंतच्या परिघामध्ये सापडले आहेत. पृथ्वीच्या साधारण जवळ असलेल्या अंतराळामध्ये एकूण २५ हजार लहान-मोठ्या आकाराचे लघुग्रह असल्याचे एक वृत्त ‘स्पेस डॉट कॉम’ ने दिले आहे.

मानवी इतिहासातील सर्वात मोठी जीवितहानी!

२०२० या वर्षाच्या सुरूवातीला ०२० डीआर टू हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. या लघुग्रहाचा व्यास साधारण ५९० मीटर इतका मोठ्या आकाराचा एखादा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर त्यामुळे मोठी हानी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. यामुळे एखाद्या मोठ्या देशाऐवढ्या परिसरामध्ये विनाश घडवू शकते. जर अशी एखादी गोष्ट अंतराळामधून पृथ्वीवर आदळली तर त्यामुळे होणारी जीवितहानी ही आतापर्यंतच्या मानवी इतिहासातील सर्वात मोठी जीवितहानी ठरू शकते, अशी भीती देखील व्यक्त करण्यात आली होती.

मात्र, आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञांच्या मते, ४६० फूटांहून अधिक आकाराची कोणतीही खगोलीय वस्तू पृथ्वीवर आदळण्याची शक्यता कमी असते. शंभरपैकी केवळ एकदाच अशी घटना घडण्याची शक्यता असते.


चीन नाही ओ..तर ‘या’ देशाने पसरवला कोरोना जगभर, डॉक्टरांनी केला दावा!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -