घरCORONA UPDATEसावधान! कोरोनाची आणखी एक लाट येणार? वॉशिंग्टन विद्यापीठाने सादर केला अहवाल

सावधान! कोरोनाची आणखी एक लाट येणार? वॉशिंग्टन विद्यापीठाने सादर केला अहवाल

Subscribe

नवी दिल्ली – कोरोनाच्या विषाणूने (Corona Virus) संपूर्ण जग वेठीस धरले होते. पहिली, दुसरी, तिसरी लाट (Corona Wave) सर्वाधिक घातक ठरली. चौथ्या लाटेनंतर जनजीवन पूर्ववत झाले. आता कोरोनाचे नियमित सापडणारे रुग्ण घटले आहेत. मात्र, असं असलं तरीही प्रत्येकाला कोरोना प्रतिबंधक नियमात राहावं लागणार आहे. कारण, वॉशिंग्टन विद्यापीठाने (Washington University) केलेल्या सर्वेक्षणात कोरोनाची आणखी एक लाट (New Wave of Corona) येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. कोरोनाचा नियमित आकडा कमी होत असला तरीही येत्या फेब्रुवारीपर्यंत जगभरात १८.७ मिलिअन रुग्ण असण्याची शक्यता वर्तवली आहे. सध्या जगभरात १६.७ मिलिअन कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. म्हणजे, येत्या काळात कोरोनाचा प्रसार पुन्हा होणार आहे.

हेही वाचा -कोरोनानंतर इबोलाची दहशत; युगांडात संचारबंदी, प्रार्थनास्थळांवरही निर्बंध

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असली तरीही कोरोनाच्या नव्या प्रजाती समोर येत आहेत. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या अहवालानुसार, कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली तरीही गेल्यावर्षीपेक्षा ती कमीच असणार आहे. २०२२ च्या जानेवारीमध्ये ओमिक्रॉन विषाणूचा (Omicron Virus) झपाट्याने प्रसार झाला होता. त्यावेळी परिस्थिती बिघडली होती, परंतु फार घातक ठरली नाही. आताही येत्या काळात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली तरीही या लाटेत मृत्यूदर अटोक्यात राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा – कोरोनाचा नवा BF.7 व्हेरियंट अतिधोकादायक; जाणून घ्या लक्षणं

- Advertisement -

फेब्रुवारीपर्यंत जगभरात दैनंदिन मृत्यूची संख्या २ हजार ७४८ पर्यंत जाण्याची शक्यता आहे. सध्या जगभरात कोरोनामुळे नियमित सरासरी १६६० जणांचा मृत्यू होतोय. तसंच, अमेरिकेत दररोज एक लाखापेक्षा जास्त रुग्ण सापडण्याचाही अंदाज यातून वर्तवण्यात आला आहे. तर, दुसरीकडे जर्मनीमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये आधीच वाढ झाली आहे. यासंबंधीचा अहवाल २४ ऑक्टोबर रोजी समोर आला होता. जर्मनीमध्ये ओमिक्रॉन सबवेरियंट BQ.1 किंवा BQ.1.1 मुळे कोरोना रुग्णात वाढ होत असल्याचं सांगितलं जातंय. तसेच, हा प्रसार युरोपच्या इतर भागांमध्ये दिसू शकते. जर्मनीमध्ये २०२० पासून रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक दिसून येत आहे, ही चिंतेची बाब आहे.

IHME च्या मते, Omicron चे subvariant XBB सिंगापूरमध्ये देखील वेगाने पसरत आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. Omicron च्या BA.5 सबवेरियंटने आधीच संक्रमित झालेल्या लोकांवर XBB चा फारसा परिणाम होणार नाही असे अहवालात नमूद केले आहे.

हेही वाचा – चीनमध्ये पुन्हा कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा फैलाव, लॉकडाऊन लागण्याची शक्यता

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -