घरCORONA UPDATEआयुर्वेदिक फॉर्मुल्याने बरा होईल कोरोनानंतरचा हाइपरग्लाइसीमिया आजार

आयुर्वेदिक फॉर्मुल्याने बरा होईल कोरोनानंतरचा हाइपरग्लाइसीमिया आजार

Subscribe

कोरोनामुक्त होणाऱ्या मधुमेह असणाऱ्या रुग्णांमध्ये आता हायपरग्लाइसीमिया आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यात अचानक रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बरीच औषधे सध्या बाजारात उपलब्ध आहेत. परंतु या आजाराला सामोरे जाण्यासाठी डीपीपी-४ इन्हिटिबिटर सर्वाधिक सुरक्षित असल्याचे आढळले आहे. जे सीएसआयआरने विकसित केलेल्या मधुमेहावरील औषध बीजीआर-३४ (BGR-34) मध्ये नैसर्गिकरित्या उपलब्ध आहेत. त्याचा मुख्य स्त्रोत दारुहरिद्र आहे. या दारुहरिद्रा घटकाचा वापर औषध तयार करण्यासाठी केला जातो.

मधुमेह आजारावरील जर्नल डायबेटिसमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, कोरोनानंतर बरे झालेल्या १४.४ टक्के रुग्णांना हाइपरग्लाइसीमिया त्रास होत आहे. एल्सवियर जर्नलच्या अहवालानुसार, अशा रुग्णांसाठी डीपीपी -4 इन्हिबिटर सर्वात सुरक्षित आणि सर्वात प्रभावी उपचार असल्याचे आढळले आहे. यात प्रामुख्याने तीन साखर ब्लॉकर असतात ज्यात सीटाग्लिप्टिन, लिनाग्लिप्टिन आणि विंडाग्लिप्टिनचा समावेश आहे.

- Advertisement -

जर्नल ऑफ ड्रग रिसर्चमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, डीपीपी -4 इन्हिबिटरचा मुख्य स्त्रोत औषधी वनस्पती दारुहरिद्रा आहे. बीजीआर-34 विकसित करणार्‍या सीएसआयआर-लखनऊ एनबीआरआयच्या प्रयोगशाळेतील वैज्ञानिक डॉ. एकेएस रावत म्हणाले की, दारुहरिद्राच्या या गुणवत्तेमुळेच त्याचा बीजीआरमध्ये समावेश करण्यात आला. यात शास्त्रज्ञांनी दारुहरिद्राच्या या क्षमतेचा सखोल अभ्यास केला होता.

दारूहरिद्र व्यतिरिक्त, दोन अन्य घटक बीजीआर -34 मध्ये उपलब्ध असतात जे हायपरग्लाइसीमिया आजारावर नियंत्रित करतात. यातील पहिला घटक म्हणजे जिमनेमिक अॅसिड. केम रेक्सिव जर्नलमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या संशोधनात असे म्हटले आहे की, जिमनेमिक अॅसिड मधुमेहा असणाऱ्या रुग्णांना हायपरग्लाइसीमिया आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करतो. याचा मुख्य स्त्रोत गुदमार हा औषधी वनस्पती आहे.

- Advertisement -

त्याचप्रमाणे मेथीमध्ये आढळणारे केमिकल ट्रिगोनोसाइड आयबी देखील हायपरग्लाइसीमियाविरूद्ध प्रतिबंधक म्हणून काम करते. या संदर्भातील सविस्तर संशोधन एनवायरमेंटल चॅलेंजेस जर्नलमध्ये प्रकाशित केले गेले आहे. बीजीआर-34 मध्ये गुडमार आणि मेथीचे घटक देखील आहेत.

बीजीआरमध्ये समाविष्ट इतर तीन औषधी वनस्पतींमध्ये गिलॉय, विजयसार आणि मजीठचा समावेश आहे. या तिनही औषधी वनस्पतींमध्ये मधुमेह आजाराविरोधीतील औषधी गुणधर्म आहेत. यावर डॉ. रावत म्हणाले की, या अभ्यासांवरून असे दिसून येते की, मधुमेह रुग्नांना कोरोनानंतर होणाऱ्या हायपरग्लाइसीमिया आजारावर उपचारांसाठी या औषधी वनस्पती अधिक फायदेशीर ठरणार आहेत.


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -