घरताज्या घडामोडीBengal Bypolls results : ममता बॅनर्जी भवानीपुर पोटनिवडणुकीत विजयी, ५८ हजार मतांनी...

Bengal Bypolls results : ममता बॅनर्जी भवानीपुर पोटनिवडणुकीत विजयी, ५८ हजार मतांनी भाजपवर मात

Subscribe

ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही निवडणूत अत्यंत महत्त्वाची होती.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर पोटनिवडणुकीत भरघोस मतांनी विजय झाला आहे. भाजपच्या उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांचा ५८ हजार मतांनी पराभव झाला आहे. ममता बॅनर्जी सुरुवातीपासून टिबरेवाल यांच्यापेक्षा आघाडीवर होत्या २१ व्या राऊंडमध्ये ममता बॅनर्जी ५८ हजार ३८९ मतांनी आघाडीवर होत्या अखेर ममता बॅनर्जी या निवडणुकीमध्ये विजयी झाल्या असून २०११ च्या तुलनेत ममता बॅनर्जी यांचा जनाधार वाढलेला दिसतो आहे. ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही निवडणूत अत्यंत महत्त्वाची होती. या निवडणुकीच्या निकालावर ममता बॅनर्जी यांच्या मुख्यमंत्रीपदाचं भवितव्य अवलंबून होते. ममता बॅनर्जींना एकूण ८४ हजार ७०९ मत मिळाली आहेत.

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार शुभेंदू अधिकारी यांनी पराभव केला होता. भवानीपूरच्या पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांच्या विरोधात निवडणूक लढवत होत्या. ममता बॅनर्जी भवानीपूर पोटनिवडणुकीमध्ये भरघोस मतांनी विजयी झाल्या आहेत. एकूण ८४ हजार ७०९ मतांनी ममता बॅनर्जी विजयी झाल्या आहेत. तर भाजपच्या उमेदवार प्रियंका टिबरेवाल या २६ हजार ३२० मतांनी विजयी झाल्या आहेत. सीपीएम उमेदवार श्रीजीब यांना ४ हजार २०१ मत मिळाली आहेत. ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला असता तर त्यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात आलं असत. परंतु ममता बॅनर्जी यांनी शानदार विजय मिळवला आहे.

- Advertisement -

भवानीपूरमध्ये खेला होबे ची धुन

ममता बॅनर्जी यांनी मत मोजणीमध्ये सुरुवातीच्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. यामुळे ममता बॅनर्जी विजयी होणार हे पक्के झाले होते. सकाळपासून ममता बॅनर्जींच्या समर्थकांनी रस्त्यावर आणि कार्यालयाबाहेर येऊन जल्लोष साजरा केला आहे. ममता बॅनर्जींच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी खेला होबे चा नारा लगावला आहे. ममता बॅनर्जी यांनीही कार्यकर्त्यांच्या जल्लोषाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तिसऱ्या फेरीत ममतांना ९९७४ मत मिळाली होती. १० व्या फेरीत ममता बॅनर्जींना एकूण ४२ हजार १२२ मत मिळाली होती. तर प्रियंका टिबरेवाल यांना १० हजार ४७७ मत मिळाली होती. ममता बॅनर्जी यांनी आघाडी कायम ठेवत अंतिम फेरीत ५८ हजार ८३२ मतांनी प्रियंका टिबरेवाल यांना मात देत विजय मिळवला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा ‘आर्यन खान’ची NCBकडून चौकशी


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -