घरक्राइमदोन बकरीचोरांना पकडताना पोलिसांना फुटला घाम; वाचा नेमका प्रकार काय?

दोन बकरीचोरांना पकडताना पोलिसांना फुटला घाम; वाचा नेमका प्रकार काय?

Subscribe

दोन बकरी चोरांना न्यायालयात नेत असताना त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की करत पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार बिहारमध्ये घडला. बिहारमधील भागलपूरमध्ये ही घटना घडली. चोरांनी पळवाट काढल्यानंतर पोलिसांना आरडाओरड करत चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. प

दोन बकरी चोरांना न्यायालयात नेत असताना त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की करत पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार बिहारमध्ये घडला. बिहारमधील भागलपूरमध्ये ही घटना घडली. चोरांनी पळवाट काढल्यानंतर पोलिसांना आरडाओरड करत चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, चोरांनी पळ काढला. दोन चोरांपैकी एकाला नागरिकांच्या मदतीने पकडण्यात पोलिसांना यश आले तर, दुसरा पळ काढण्यात यशस्वी ठरला. (bhagalpur two goat thief ran away in front of two constables while going to court movie like incident in bhagalpur)

नेमके प्रकरण काय?

- Advertisement -

बुधवारी दुपारी येथील न्यायालयात हजर केले जात असताना कचरी चौकाजवळ बकऱ्या चोरताना पकडलेले दोन चोरटे हातकड्या व दोरीच्या सहाय्याने फरार झाले. त्याच्या पलायनाने नाथनगर पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या दोन होमगार्डना घाम फुटला. सोनू खाटिक आणि करू कुमार अशी चोरांची नावे असून, या दोघांना चोरीच्या आरोपामुळे रिक्षामधून न्यायालयात नेले जात होते. त्यावेळी कचरी चौकाजवळील भगवती प्रांगणासमोर ऑटो पोहोचताच दोन्ही चोरट्यांनी जवानांना धक्काबुक्की करत हातकड्या आणि दोरीने पलायन केले.

चोरांना पळ काढताच पोलिसांनीही त्यांचा पाठलाग केला. त्यावेळी पोलिसांनी आरडाओरड करत परिसरातील नागरिकांना चोरांना पकडण्याची विनंती केली. मात्र कोणीही मदतीसाठी पुढे येत नव्हते. कारण चोर धावतांना नागरिकांना मारण्याची धमकी देत होते. या धमकीमुळे नागरिकही पुढे आले नाही. दरम्यान, दोन्ही चोरट्यांनी सुमारे एक किलोमीटरपर्यंत पळ काढल्यानंतर अचानक एकजण रस्त्यालगतच्या कारू रोडवर वाढलेल्या झुडपाच्या आच्छादनात लपला, तर सोनू पळत असताना नजरेआड झाला.

- Advertisement -

दरम्यान, पोलिसांच्या सांगण्यावरून काही लोकांनी सहकार्य केल्याने आरोपी कारू हा झुडपात लपलेला आढळून आला. तर दुसरा आरोपी सोनू पळून जाण्यात यशस्वी झाला. दुसरीकडे दोन्ही आरोपी पळून गेल्याची माहिती मिळताच नाथनगर पोलीस ठाण्याचे अध्यक्ष महंमद महताब खान हे स्वत: पोलीस फौजफाट्यासह तेथे पोहोचले. त्यानंतर आरोपी कारूला अटक करत न्यायालयात नेण्यात आले. त्याला न्यायालयीन कोठडीत हजर करण्यात आले. दरम्यान, सोनूला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक छापेमारी करत होते.

पळून गेल्याच्या घटनेची माहिती वायरलेस मेसेजद्वारे सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आली आहे. नाथनगर, जोगसर, बरारी आणि विद्यापीठ पोलिसांना विशेष सतर्क करण्यात आले आहे. या पोलिस ठाण्यांचा काही भाग गंगा डायराला लागून आहे. आरोपी सोनू याच भागात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कसबा गावातील रहिवासी महंमद राजू यांची बकरी चोरली

25 एप्रिल रोजी सायंकाळी नाथनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कसबा गावातून कारू आणि सोनू हे शेळी व त्याचे पिल्लू चोरून पळून जात असताना कुटुंबीयांनी आरडाओरडा केला, त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली.


हेही वाचा – “ठाकरेंच्या मागे नेमकी कोणती शिवसेना?” निलेश राणेंची व्हिडीओच्या माध्यमातून टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -