घरदेश-विदेशBharat 5G Portal : दूरसंचार विभागाने लाँच केले 'भारत 5G पोर्टल'; 'या'...

Bharat 5G Portal : दूरसंचार विभागाने लाँच केले ‘भारत 5G पोर्टल’; ‘या’ कामांमध्ये होणार मदत

Subscribe

नवी दिल्ली : भारत दूरसंचार कार्यक्रमात (Bharat Telecom 2024) दूरसंचार विभागाने भारत 5G पोर्टल (Bharat 5G Portal) सुरू केले आहे. दूरसंचार विभागाचे सचिव डॉ. नीरज मित्तल यांनी भारत 5G पोर्टल लाँच केले आहे. नीरज मित्तल यांनी खुलासा केला की, आता क्वांटम, IR, 5G आणि 6G नेटवर्कवर सर्व काम समान तत्त्वावर केले जाईल. त्यांच्यामते भारत सर्वोत्तम 5G रोलआउटला वेग देत आहे. तसेच भारताचे दूरसंचार नेटवर्क हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क आहे. (Bharat 5G Portal Department of Telecom launches Bharat 5G Portal)

हेही वाचा – Babanrao Taywade : ओबीसीत फूट? भुजबळ, वडेट्टीवार दिशाभूल करतायत; तायवाडेंच्या आरोपाने खळबळ

- Advertisement -

दूरसंचार क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी एक मोठा पुढाकार घेत आहे. यासाठी दूरसंचार सचिव मित्तल यांनी गुंतवणूकदारांना भविष्यातील स्टार्टअपशी जोडण्यासाठी विशेष बैठकही सुरू केली असून ‘ब्रिजिंग ड्रीम्स अँड फंडिंग: कनेक्टिंग व्हेंचर कॅपिटल/इन्व्हेस्टर्स विथ द फ्युचर ऑफ स्टार्टअप’ असे या बैठकीचे शीर्षक आहे. विशेष बैठक सत्र सुरू झाल्यामुळे आता दूरसंचार क्षेत्रातील स्टार्टअपसाठी गुंतवणुकीच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. या सत्रादरम्यान 26 स्टार्टअप्सनी नाविन्यपूर्ण दूरसंचार उत्पादनांवर सादरीकरणे दिली. या बैठकीत 10 हून अधिक उद्यम भांडवलदार/गुंतवणूकदार सहभागी झाले होते.

- Advertisement -

दूरसंचार विभागाने सांगितले की, सरकारने पुढील दूरसंचार तंत्रज्ञानावर काम सुरू केले आहे. सरकारने 6G मोबाइल नेटवर्कसाठी इकोसिस्टम विकसित करण्यावर वेगवान संशोधनासाठी प्रस्ताव आमंत्रित केले आहेत. दूरसंचार सचिव नीरज मित्तल यांच्या म्हणण्यानुसार, हे वन-स्टॉप सोल्यूशन म्हणून काम करेल. तसेच 5G नेटवर्क रोलआउटमध्ये म्हणजेच 5G नेटवर्कचा वापर करण्यात भारत जगात आघाडीवर आहे.

भारतात आज एक लाख स्टार्टअप्स

नीरज मित्तल म्हणाले, भारतात जगातील दुसऱ्या क्रमांकाचे दूरसंचार नेटवर्क आहे. भारताने फार कमी वेळात स्वदेशी 4G/5G तंत्रज्ञान विकसित करून संपूर्ण जगाला ‘चकित’ केले आहे. याशिवाय भारतात आज एक लाख स्टार्टअप्स आहेत. जगभरातील देशांना भारताला सहकार्य करण्याची ही मोठी संधी आहे. कारण भारत हा विश्वासार्ह भागीदार असल्याचे जगाला समजले आहे. प्रत्येकाला आता 5G किंवा 6G तंत्रज्ञानावर भारताला सहकार्य करायचे आहे. त्यामुळे आता सरकार दूरसंचार क्षेत्रातील स्टार्टअपसाठी गुंतवणुकीची सुविधाही उपलब्ध करून देत आहे, अशी माहिती नीरज मित्तल यांनी दिली.

हेही वाचा – Budget 2024: जनधन योजनेला महिलांची पसंती; खाते उघडण्यात मारली ‘फिफ्टी’

भारतीय उत्पादकांसाठी नवीन व्यवसाय निर्माण करण्याची संधी

नीरज मित्तल म्हणाले की, सरकारचा असा विश्वास आहे की, असे उपक्रम हे दूरसंचार उद्योगाच्या तांत्रिक प्रगती आणि विकासासाठी भारताच्या वचनबद्धतेचा पुरावा आहेत. भारतात तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी टेक स्टार्ट-अप इको-सिस्टम आहे. जागतिक स्तरावर आपण अधिकाधिक स्टार्ट-अपच्या सहभागाला प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यामुळे आता भारतीय उत्पादकांसाठी नवीन व्यवसाय संधी निर्माण करण्याची गरज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -