घरताज्या घडामोडीBharat Band: पंजाब,हरियाणात सार्वजनिक वाहतूक सेवा ठप्प

Bharat Band: पंजाब,हरियाणात सार्वजनिक वाहतूक सेवा ठप्प

Subscribe

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यातील जनजीवन विस्कळीत

केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी काल भारत बंदची (Bharat Band) हाक देण्यात आली. ४० शेतकरी संघटनांनी या बंदमध्ये सहभाग घेतला होता. गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर भारत बंदच्या हाकेनंतर कृषी कायद्याविषयी निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान सोमवारी झालेल्या भारत बंदला देशभरातून शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिल्याचे पहायाला मिळाले. पंजाब,हरियाणा आणि उत्तर प्रदेशात भारत बंदचा सर्वाधिक प्रभाव जाणवला. (Bharat Band: Big impact of Bharat Bandh in Punjab, Haryana)  भारत बंदच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहायला मिळाले. संयुक्त शेतकरी संघटनांनी विविध ठिकाणी प्रदर्शने केली तसेच अनेक राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम करण्यात आला. रेल्वे रुळावर देखील शेतकऱ्यांनी आंदोलन केले त्यामुळे रेल्वे सेवा काही काळासाठी ठप्प झाल्या होत्या. भारत बंदचा सर्वाधिक परिणाम हा विविध राज्यातील सार्वजनिक वाहतूक सेवांवर झाल्याचे पहायला मिळाले.

हरियाणामधील १७ जिल्ह्यांतील जनजीवन भारत बंदमुळे विस्कळीत झाले. आंदोलनकर्त्यांनी हरियाणामध्ये ३२० ठिकाणी चक्का जाम केला होता. तर पंजाबमध्ये ३७० हून अधिक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला होता. सोनीपत येथे २५० हून अज्ञात शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. उत्तर प्रदेशच्या दिल्ली -मेरठ एक्सप्रेसवे वर अनेक तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

- Advertisement -

दिल्ली एनसीआरमधील नागरिकांना भारत बंदचा सामना करावा लागला. दिल्ली आणि शेजारील राज्यातून येणाऱ्या अनेक मार्गांवर वाहनांचा रांगा तसेच शेतकऱ्यांकडून चक्का जाम करण्यात आला होता. नोएडा,गाझियाबाद,फरिदाबाद,गुरुग्राम येथे हजारो लोक आपल्या वाहनांमध्ये तासंतास बसून होते. दिल्लीतील काही भागांमध्ये केवळ परिस्थिती नियंत्रणात होती.

शेतकऱ्यांनी दिलेली भारत बंदची हाक ही ऐतिहासिक ठरली असे म्हणता येईल कारण देशातील अनेक राज्यातील शेतकऱ्यांनी भारत बंदला पाठिंबा देत शेतकरी रस्त्यावर उतरले होते.

- Advertisement -

शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग सोडून संवादाच्या मार्गावर या. कृषी कायद्यांवरील शेतकऱ्यांची हरकतींचा विचार करण्यासाठी सरकार तयार आहे. शेतकरी चळवळीच्या नावाखाली राजकारण होऊ नये. शेतकरी आपल्या सर्वांचे असल्याचे देशाचे कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले.


हेही वाचा – दिल्लीच्या सर्व पर्यटनस्थळांची माहिती एका क्लिकवर; मुख्यमंत्री केजरीवालांनी लाँच केलं ॲप

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -