घरताज्या घडामोडीभारत बंद- ५३९ गाड्या रद्द, रेल्वेस्थानकावर अडकले हजारो प्रवासी

भारत बंद- ५३९ गाड्या रद्द, रेल्वेस्थानकावर अडकले हजारो प्रवासी

Subscribe

निदर्शकांनी अनेक राज्यांमध्ये रेल्वेगाड्या पेटवत जाळपोळ करत दगडफेक केली. तसेच भारत बंदचे आवाहन केले आहे.

केंद्र सरकारच्या सैन्यदलातील अग्निपथ योजनेविरोधात देशभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यादरम्यान, संतप्त निदर्शकांनी अनेक राज्यांमध्ये रेल्वेगाड्या पेटवत जाळपोळ करत दगडफेक केली. तसेच भारत बंदचे आवाहन केले आहे. यामुळे कुठलीही अनुचित घटना घडू नये याची खबरदारी घेत भारतीय रेल्वेने (Indian Railway) आज २० जून रोजी वेगवेगळ्या राज्यांमधील ५३९ रेल्वे रद्द केल्या आहेत. यात पॅसेंजरसह एक्सप्रेस गाड्यांचाही समावेश आहे. परिणामी जागोजागी रेल्वेस्थानकावर प्रवासी अडकले आहेत.

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. ही योजना मागे घ्यावी अथवा त्यात योग्य त्या तरतूदी कराव्यात अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.पण सरकारने यावरील आपली भूमिका स्पष्ट केली असून ही योजना मागे घेता येणार नाही असे ठामपणे सांगितले आहे. परिणामी बिहारबरोबरच देशातील इतर राज्यांमध्येही अग्निपथ योजनेविरोधात तरुण मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. यादरम्यान निदर्शकांनी रेल्वेला लक्ष्य करत जाळपोळ केली. तर काही ठिकाणी दगडफेक केल्याच्या घटना घडल्या. तसेच २० जूनला भारत बंदची घोषणाही आंदोलनकरत्यांनी केली आहे. यामुळे रेल्वेने शेकडो गाड्या रद्द केल्या परिणामी दिल्ली, बिहार, युपी, झारखंडसह इतर राज्यांमधील रेल्वे स्थानकांवर हजारो प्रवासी अडकले आहेत.

- Advertisement -

भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार अग्निपथ हिंसाचारानंतर आज सकाळी ८ वाजेपर्यंत एका दिवसात ५३९ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ज्यात १८१ मेल एक्स्प्रेस आणि ३४८ पॅसेंजर गाड्यांचा समावेश आहे. तर ४ मेल एक्सप्रेस आणि ६ पॅसेंजर गाड्या काही ठराविक वेळांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत.

जागोजागी वाहतूक कोंडी

- Advertisement -

दरम्यान, निदर्शकांनी पुकारलेल्या भारत बंद हाकेमुळे रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये नागरिकांनी प्रवाशासाठी रस्तेमार्ग निवडला आहे. यामुळे जागोजागी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असून महामार्गांवर गाड्यांच्या रांगाचा रांगा लागल्या आहेत.

 

 

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -