घरताज्या घडामोडीLive Update: लालबाग दुर्घटना,मुख्यमंत्री कार्यालयाकडून मदत जाहीर

Live Update: लालबाग दुर्घटना,मुख्यमंत्री कार्यालयाकडून मदत जाहीर

Subscribe

मुख्यमंत्री सहायता निधीमधून लालबाग सिलेंडर स्फोटात मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रूपये तर जखमींना पन्नास हजार रूपयांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.


विधानपरिषदेच्या पाच नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ

- Advertisement -

विधानपरिषदेच्या औरंगाबाद, नागपूर, पुणे विभाग पदवीधर आणि पुणे, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेवर निर्वाचित झालेल्या पाच नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी मंगळवारी मुंबई विधानभवनात झाला. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी पाच नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस मधून औरंगाबाद पदवीधरचे सतीश चव्हाण , काँग्रेस मधून नागपूर पदवीधरचे अभिजित वंजारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे पदवीधरचे अरुण लाड , काँग्रेसचे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे जयंत आसगांवकर आणि अपक्ष मधून अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे किरण सरनाईक यांनी आज आपल्या पदाची शपथ घेतली.

- Advertisement -

औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळे उद्यापासून पर्यटकांसाठी खुली. जगप्रसिद्ध अंजिठा वेरूळची लेणी उद्यापासून पर्यटनासाठी खुली होणार आहे. उद्यापासून २ हजार पर्यटकांना या लेण्यांमध्ये प्रवेश मिळणार आहे.


नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने आज ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे. गेल्या १३ दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. ९ डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.


उद्या शरद पवार, राहुल गांधी घेणार राष्ट्रपतींची भेट

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातले शेतकरी आक्रमक झाले असतानाच आता या विषयावर राजकारणही तापण्याची चिन्हं आहेत. या कायद्याविरोधात उद्या शरद पवार, राहुल गांधी यांच्या सोबत विरोधी पक्षाचे नेते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. याबाबत सीपीआय (एम) चे नेते सीताराम येचुरी यांनी सांगितलं की विरोधी पक्षाचे एक प्रतिनिधीमंडळ ९ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे.


केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमधील सहाव्या बैठकीआधीच अमित शहा यांनी आज सायंकाळी ७ वाजता बोलावली बैठक


राज्यात ३ हजार ७१७ एसटी बसेसच्या फेऱ्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्या आहेत.


“मोदीजी शेतकऱ्यांकडून चोरी बंद करा,” राहुल गांधी

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. मोदीजी शेतकऱ्यांडून चोरी बंद करा अशी टीका त्यांनी केली आहे. भारत बंदला समर्थन देऊन अन्नदात्याचा संघर्ष यशस्वी करा असं आवाहन यावेळी त्यांनी केले आहे.


शेतकरी विरोधी कायद्यांच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे आयोजित भारत बंद आंदोलनात डॉ. नितिन राऊत सहभागी


मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नजरकैदेत नाहीत – दिल्ली पोलिस
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलेले नाही असे स्पष्टीकरण दिल्ली पोलिसांकडून देण्यात आले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर असणारा बंदोबस्त हा केवळ कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठेवण्यात आला आहे. आम आदमी पार्टी आणि इतर राजकीय पक्षांमध्ये कोणताही वाद होऊ नये यासाठीच ही खबरदारी घेण्यात आली आहे.


विरोधी पक्षाची भूमिका ढोंगी – प्रकाश जावडेकर
शेतकऱ्यांना मागितल्या जाणाऱ्या मोबदल्याच्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक किंमत आम्ही देत आहोत. कॉंग्रेसेने त्यांच्या राजवटीत काहीही देऊ केले नाही. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच ही अतिरिक्त किंमत दिली आहे. विरोधी पक्षाकडून संपुर्ण कायदाच बदलण्याची भाषा ही ढोंगीपणाची आहे. कॉंग्रेसच्याच काळात कंत्राटी शेतीचे कायदे संमत झाले. महत्वाच म्हणजे कॉंग्रेसनेच या कायद्यांचा समावेश त्यांच्या जाहीरनाम्यातही केला आहे, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले आहे.

राजकीय बंद नाही, ही जनतेची भावना आहे – संजय राऊत

भारत बंद राजकीय नाही, शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून उत्फुर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. कोणत्याही राजकीय पाठबळाशिवाय हा संप असल्याचे विरोधी पक्षाने समजून घ्यायला आहे. केंद्र सरकार मनापासून जेव्हा काम करेल तेव्हा शेतकऱ्यांचा दबाव केंद्रावर नसेल. शेतकऱ्यांचे म्हणणे केंद्राने एकायल हव. कोणत्याही जबरदस्तीने हा संप करण्यात आलेला नाही. मर्यादित स्वरूपाचा संप असल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

अरविंद केजरीवाल यांना हाऊस अरेस्ट – आम आदमी पार्टी

भारत बंदला समर्थन देणाऱ्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हाऊस अरेस्ट करण्यात आल्याचा दावा आम आदमी पक्षामार्फत करण्यात आला आहे.

 



आज शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंद ला महाविकास आघाडीने पाठिंबा दर्शविला आहे. राज्यभरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांचा या बंदमध्ये सक्रिय सहभाग होणार आहे. राज्यभरातील जिल्हाधिकारी/तहसील कार्यालयाला राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा/तालुका पदाधिकारी भेटून निवेदन देणार आहेत. मोदी सरकारने हा शेतकरी विरोधी कायदा त्वरित मागे घ्यावा, ही मागणी करणार आहेत. राज्यभरातील बाजार समित्यांनी बंद पाळला असून शेतकऱ्यांचे समर्थन करत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.


भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) च्या देशभरातील कर्मचाऱ्यांचा भारत बंदला पाठिंबा.


भारत बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत दुधासह फळभाज्यांचा पुरवठा होणार नाही. आज दुपारनंतर मुंबईत दुधाचे टँकर तसेच दुधाचा पुरवठा करणाऱ्या गाड्या येणार नाहीत.
(सविस्तर वाचा)


मुंबईच्या रस्त्यावर आज एकूण क्षमतेपैकी २ हजार ९१३ बसेस धावल्या तर बेस्टसाठी सेवा देणाऱ्या एसटीच्या ३२६ बसेस रस्त्यावर धावल्याची माहिती मिळतेय.


भारत बंदला कल्याणमधील काही सामाजिक संघटना, रिक्षा टॅक्सी संघटना, एपीएमसी व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. भारत बंदला पाठिंबा देताना कल्याण एपीएमसी मार्केट बंद ठेवण्यात आले आहे. तर शहरात सर्व ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त आहे.


ठाण्यात पूर्व द्रूतगती मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आहे. भारतीय जय हिंद पार्टीकडून शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ भारत बंदला पाठिंबा देत हे आंदोलन करण्यात आलंय यामुळे वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला.


आज ‘भारत बंद’ असला तरी देखील पुण्यातील APMC मार्केट सुरू असल्याचे पाहायला मिळतेय. पुण्यातील एपीएमसी मार्केट सुरु आहे. स्थानिक व्यापारी सचिन पायगुडे यांनी म्हटलं आहे की, “आमचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आहे. पण आम्ही मार्केट सुरु ठेवलं आहे जेणेकरुन इतर राज्यांमधून येणारा शेतमाल साठवता येईल. उद्याही त्याची विक्री होऊ शकते”.


‘भारत बंद’ असला तरी मुंबईत बेस्ट, रेल्वे सेवा सुरु

भारत बंद असला तरी मुंबईतील बेस्ट आणि रेल्वे सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही. बेस्ट आणि रेल्वे सुरुच राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


शेतकरी संघटनांनी जाहीर केलेल्या देशव्यापी बंदला राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी पाठिंबा दिला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीही यात सहभागी होणार असून माथाडी, व्यापारी शंभर टक्के सहभागी होणार आहेत. राज्यातील सर्वात मोठी समिती ही मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. या माध्यमातून मुंबई, ठाणे आणि उपनगरात शेतमालाचा पुरवठा केला जातो. या बाजारात भाजीपाला, फळं, कांदा-बटाटा, धान्य आणि मसाला मार्केट हे पाच बाजार आहेत. यातील व्यापारी आणि माथाडी यांनाही नवीन कृषी कायद्यांमुळे मोठा फटका बसणार आहे.


तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडलेल्या शेतकरी संघटनांनी मंगळवारी ‘भारत बंद’ची हाक दिली. त्यास विरोधकांनी पाठिंबा दिला. असं असलं तरी भारत बंद दरम्यान सोमवारी काही शेतकरी संघटनांनी कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांच्या काही संघटनांनी नव्या कृषी कायद्यांचं समर्थन केलं. तसंच यासंदर्भात एक पत्रदेखील कृषीमंत्र्यांना देत नवे कायदे रद्द न करण्याची मागणी करण्यात आली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -