घरदेश-विदेशआज 'भारत बंद'; वाचा काय सुरू आणि काय बंद

आज ‘भारत बंद’; वाचा काय सुरू आणि काय बंद

Subscribe

केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी गेले चार महिने दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. दरम्यान, शुक्रवारी म्हणजेच आज शेतकऱअयांनी भारत बंदची हाक दिली आहे. हा बंद सकाळी ६ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत असणार आहे. शेतकऱ्यांच्या या भारत बंदला देशातील अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे.

शेतकरी नोव्हेंबरपासून कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. संयुक्त किसान मोर्चाने भारत बंद बाबात एक निवेदन जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी दिल्लीतल्या सीमेवरील शेतकरी संघर्षाला आज २६ मार्च रोजी ४ महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आहे, त्या पार्श्वभूमीवर शेतकरी विरोधी सरकारविरोधात भारत बंद होईल. या बंदला विविध शेतकरी संघटना, कामगार संघटना, विद्यार्थी संघटना, बार संघटना, राजकीय पक्ष आणि राज्य सरकार यांच्या प्रतिनिधींनी या बंदला पाठिंबा दर्शविला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

काय सुरू आणि काय बंद?

भारत बंदमध्ये सर्व दुकानं, मॉल, बाजारपेठा आणि संस्था बंद ठेवल्या जातील. सर्व छोटे-मोठे रस्ते आणि गाड्या रोखण्यात येतील. रुग्णवाहिका व इतर आवश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद राहतील. दिल्लीतही भारत बंदचा परिणाम होणार आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -