घरताज्या घडामोडीBharat Bandh: उद्या व्यापारी संघटना 'CAIT' कडून 'भारत बंद'; देशभरातील व्यापार ठप्प

Bharat Bandh: उद्या व्यापारी संघटना ‘CAIT’ कडून ‘भारत बंद’; देशभरातील व्यापार ठप्प

Subscribe

जीएसटीच्या नियमांच्या समिक्षेची मागणी करत उद्या म्हणजेच २६ फेब्रुवारी रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आलं आहे. देशभरातील व्यापाऱ्यांची संघटना ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ अर्थात ‘कॅट’कडून भारत बंद केले जाणार आहे. या भारत बंदमध्ये तब्बल ८ कोटी व्यापारी सहभागी होणार असून या बंदला पाठिंबा देण्यासाठी ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफेयर असोसिएशन ‘चक्का जाम’ आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर देशात १५०० जागी धरणे आंदोलन केले जाणार असून या व्यापारांच्या संपामुळे देशभरातले बाजार राहणार बंद राहणार आहेत.

४० हजारांहून अधिक व्यापाऱ्यांचे बंदला समर्थन

वस्तू आणि सेवा कराच्या म्हणजेच GST च्या रचनेत फेरबदल करण्याच्या मागणीला जोर येण्यासाठी हा देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. तर व्यापाऱ्यांकडून ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनवर ताबडतोब बंदी लावण्याचीही मागणी करण्यात आली आहे. देशातील सर्व राज्यांतील व्यापाऱ्यांच्या संघटनांनी ‘व्यापार बंद’मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचा ‘कॅट’कडून दावा करण्यात आला आहे. इंधन भाववाढीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅट’च्या भारत बंदला ‘ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेल्फेअर असोसिएशन’ कडूनही समर्थन मिळालंय. २६ फेब्रुवारी रोजी ‘चक्का जाम’ करण्याची योजनाही आखण्यात आली आहे. ‘कॅट’सोबत देशभरातील जवळपास ४० हजारांहून अधिक व्यापारी ‘भारत बंद’चं समर्थन करत आहेत.

- Advertisement -

सर्वसामान्यांवर परिणाम होणार नसला तरी…

दरम्यान कॅटकडून असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, देशभरात व्यापाऱ्यांचा हा विरोध शांततेने पार पडेल. तर होलसेल आणि रिटेल बाजारही पूर्णत: बंद राहतील. परंतु, अत्यावश्यक वस्तुंची विक्री करणारी दुकानं मात्र या बंदमधून वगळण्यात येणार आहे. तर व्यापाऱ्यांच्या या संपाचा सर्वसामान्यांवर थेट परिणाम होणार नसला तरी त्या दिवशी सगळे घाऊक बाजार बंद राहणार आहे. त्यामुळे माल वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

या संघटनांचाही बंदला पाठिंबा

देशातील दळणवळण क्षेत्रातील सर्वाधिक मोठी ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफेअर असोसिएशनने सर्वप्रथम कॅटच्या या व्यापारी बंदला समर्थन दिले आहे. अनेक राष्ट्रीय व्यापारी संघटनाही या व्यापारी बंदला पाठिंबा देत आहे. यामध्ये विशेषकरून ऑल इंडिया एफएमजीसी डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशन, फेडरेशन ऑफ ऍल्युमिनियम युटेन्सिल्स मॅन्युफॅक्चरर्स अँड ट्रेडर्स असोसिएशन, नॉर्थ इंडिया स्पायसेस ट्रेडर्स असोसिएशन, ओळ इंडिया कम्प्युटर डीलर्स असोसिएशन, ओळ इंडिया कॉस्मॅटिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन इत्यादी संघटना आहेत.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -