घरट्रेंडिंगBharatBandh Live : मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत मनसे कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

BharatBandh Live : मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत मनसे कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

Subscribe

आज देशभरात भारत बंदची हाक देण्यात आली असून काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही बंदला पाठिंबा दर्शवला आहे.

इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस पक्षाने आज ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. या बंदला इतरही विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवला असून सोमवार सकाळपासूनच देशभरात या बंदचे पडसाद उमटू लागले आहेत. बंदमध्ये सहभागी झालेल्या पक्षांचे नेते आज रस्त्यावर उतरणार असून सरकारच्या इंधन दरवाढी विरोधात तीव्र निषेध व्यक्त करणार आहे. हा बंद शांततेच्या मार्गाने आणि सरकारी मालमत्तेचं नुकसान होऊ न देता आंदोलन करणार असल्याचे काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. देशातील अनेक ठिकाणी दुकानं, बाजारपेठा, कार्यालय बंद राहणार असून या बंदमधून रुग्णालये, औषधांची दुकानं, दूध केंद्र तसेच इतर अत्यावश्यक सुविधांना वगळण्यात आलं आहे.


पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मनसे कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्याची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी निषेध करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. सिद्धिविनायक मंदिरात पोस्टल स्टॅम्पच्या प्रकाशनासाठी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमानंतर मनसेने हे आंदोलन केले.


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारत बंदला पाठिंबा दर्शवला असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीसोबत त्यांनी व्यासपीठावर उपस्थिती दर्शवली.

- Advertisement -

गुजरातमध्ये टायर जाळले, पटनात रेल रोको केला 

भारत बंदचे पडसाद उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, महाराष्ट्र आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिसा या राज्यात उमटताना दिसत आहेत. कर्नाटकच्या दक्षिण-पूर्व कलबुर्गी या परिसरात बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे. बस स्थानकांवर शुकशुकाट असल्याचा पाहायला मिळत आहे. तेलंगणा आणि हैरदाबादमध्येही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून सरकार विरोधात घोषणा बाजी करत आहेत. आंध्र प्रदेशच्या विजयवाडा येथे मोठ्या संख्येने विरोधक सरकार विरोधात प्रदर्शनं करत असून गुजरातमधील भरूच येथे काही ठिकाणी टायर जाळण्याचे तसेच बसेस अडवण्याचे प्रकार समोर आले आहेत. पटनातील जन अधिकारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला. तेथील राजेंद्र नगर टर्मिनस रेल्वे स्थानकावर हा प्रकार घडला.

सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत बंद पाळण्यात येणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी स्वतः या बंदमध्ये उतरले आहेत. दिल्लीतील राजघात येथे त्यांनी रस्त्यावर उतरून इंधन दरवाढी विरोधात निषेध व्यक्त केला आहे.

- Advertisement -


देशभरातून तब्बल २१ पक्षांनी या बंदला पाठिंबा दिल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. द्रमुक, राष्ट्रीय जनता दलसह इतर पक्षांनीही भारत बंदला पाठिंबा दर्शवला असून यामध्ये माजी पंतप्रधान एचडी देवेगौडादेखील सामील असल्याचे सांगितले जात आहे. तर उर्वरीत पक्षांनाही त्यांनी बंदमध्ये सहभागी होण्याची आवाहन केले आहे. दुसरीकडे तृणमूल काँग्रेस पक्षाने इंधन दरवाढीच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे, मात्र ते बंदला पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.


ओडिसा येथील भुवनेश्वर येथे विरोधकांनी रस्त्यावर उतरून बंदला सुरुवात केली. कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढून सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -