घरताज्या घडामोडीCorona Vaccine: दिलासादायक! ब्रिटनच्या नव्या कोरोना स्ट्रेनवर 'कोव्हॅक्सिन' ठरली प्रभावी

Corona Vaccine: दिलासादायक! ब्रिटनच्या नव्या कोरोना स्ट्रेनवर ‘कोव्हॅक्सिन’ ठरली प्रभावी

Subscribe

ब्रिटनच्या नव्या कोरोना व्हायरसच्या स्ट्रेन काही देशामध्ये थैमान घातले आहे. अनेक देशातील कोरोना लस विकसित करणाऱ्या कंपन्यांनी आपली लस या नव्या स्ट्रेन प्रभावी असल्याचा दावा केला आहे. आता अशाच प्रकारे भारतीय बनावटीची लस कोव्हॅक्सिन ही ब्रिटनच्या नव्या स्ट्रेन प्रभावी असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIA), भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि भारत बायोटेकच्या तज्ज्ञांनी या लसीवर अभ्यास करून एक अहवाल सादर केला. त्यामध्ये कोव्हॅक्सिनचे दोन डोस कोरोनासह अन्य व्हायरसवर देखील प्रभावी असल्याचे या अहवाल स्पष्ट करण्यात आले आहे.

ब्रिटनमध्ये जो नव्या कोरोना व्हायरसचा स्ट्रेन आहे, तो आधीच्या कोरोनापेक्षा जास्त संक्रमक आहे. अनेक देशांमध्ये या व्हायरस हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहे. भारतामध्ये १०० हून अधिक लोकांमध्ये नव्या कोरोनाचा स्ट्रेन आढळलेला आहे. यापैकी काही रुग्णांवर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचा प्रयोग केला आणि २ डोस दिल्या नंतर त्यांच्यामध्ये समाधानकारक परिणाम दिसून आले. या रुग्णांच्या शरीरामध्ये समाधानकारक अँटीबॉडीज तयार होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ब्रिटनचा जो जास्त संक्रमक स्ट्रेन आहे आणि ज्यामुळे संपूर्ण जगभरात भीती निर्माण झाली आहे. त्याच्यावर भारताची स्वदेशी बनावटीची लस कोव्हॅक्सिन ही प्रभावी ठरली आहे. त्यामुळे भारतीयांसाठी ही दिलासादायक बाब आहे.

- Advertisement -

हेही वाचा – लसीकरणासाठी वॉक-इनला आरोग्य कर्मचार्‍यांचे प्राधान्य


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -