घरदेश-विदेशFact Check: भारत बायोटेकच्या Covaxin लसीला १२ वर्षांवरील मुलांनाही देण्यास मान्यता? जाणून...

Fact Check: भारत बायोटेकच्या Covaxin लसीला १२ वर्षांवरील मुलांनाही देण्यास मान्यता? जाणून घ्या सत्य

Subscribe

देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मृत्युच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. कोरोना महामारीशी लढा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार युद्धपातळीवर काम करत आहेत, त्याअंतर्गत सर्व राज्यात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहेत. या मोहिमेला आणखी गती देण्यासाठी केंद्र सरकारने १८ वर्षावरील सर्वांना १ मेपासून लस देण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, अजूनही असे बरेच लोक आहेत, जे दररोज लसीबद्दल नवीन अफवा पसरवत आहेत.

नुकतीच सोशल मीडिया एका युजरने अशी पोस्ट केली की, एक चांगली बातमी आहे, भारत बायोटेकद्वारे निर्मित Covaxin आता १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना देखील देण्यात येणार आहे. यासाठी शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. हे ट्वीट चांगलेच व्हायरल झाले असून त्या ट्वीटला ६ हजारांहून अधिक रीट्वीट आणि २७ हजार लाईक्स मिळाले. लोकांनी हा मॅसेज त्वरित फॉरवर्ड करण्यास सुरवात केली. त्याचबरोबर प्रत्येकाने पालकांना आपल्या मुलांना लसी देण्याचे आवाहन केले.

- Advertisement -

तर दुसरीकडे, आता हे ट्विट भारत सरकारच्या प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने (PIB) तपासले आहे. पीआयबीच्या मते, भारतात मुलांना कोणतीही लस मंजूर करण्यात आलेली नाही. जरी काही लस बनवल्या गेल्या तरी त्यांची चाचणी सुरू आहे. याशिवाय भारत बायोटेकने स्वदेशी लस तयार केली असून सरकारने १८ वर्षांखालील लोकांसाठी परवानगी दिली नाही. हा व्हायरल होणारा मॅसेज फसवा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान, भारत सरकारने भारत बायोटेकच्या Covaxin, सीरम इन्स्टिट्यूटच्या covishield आणि रशियन लस sputnik V यांना मान्यता दिली आहे. या तीन लसी देशभरातील लोकांना लागू केल्या जात आहेत. यासह सरकारने स्पष्ट केले की, या तीन लस केवळ १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -