घरCORONA UPDATEDCGI ने भारत बायोटेक लसींची एक्सपायरी डेट १२ महिन्यांपर्यंत वाढवली, स्टॉक होणार...

DCGI ने भारत बायोटेक लसींची एक्सपायरी डेट १२ महिन्यांपर्यंत वाढवली, स्टॉक होणार रि-लेबल

Subscribe

भारतातील अग्रगण्य लस उत्पादक कंपनी म्हणून भारत बायोटेकचे नाव घेतले जाते. भारतात लसीकरण मोहिमेच्या सुरुवातीला सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशील्ड लसीबरोबर भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीचा वापर केला जात आहे. मात्र DGCI ने भारत बायोटेकच्या कोवॅक्सीन लसींची एक्सपायरी डेट ९ महिन्यांपर्यंत होती ती आता १२ महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे ९ महिन्यांची मुदत संपलेल्या लसींचा स्टॉक आता पुन्हा रिलेबल केला जाईल.

यासाठी भारत बायोटेक कंपनी हॉस्पिटल आणि इतर लसीकरण केंद्रांवरील लसींचा स्टॉक परत मागवत आहे. आता या स्टॉकला पुन्हा नवे लेबल लावले जाईल. या स्टॉकवरील एक्सपायरी डेट १२ महिन्यांपर्यंत वाढवल्यानंतर हा स्टॉक पुन्हा आवश्यक त्या ठिकाणी पाठवला जाईल.

- Advertisement -

सूत्रांच्या माहितीनुसार, भारत बायोटेक आता न वापरलेल्या लसींचा स्टॉक गोळा करत असून त्यांची एक्सपायरी डेट अपडेट करत आहे. तसेच त्यांचे पुन्हा लेबलिंग केले जातेय. डीजीसीआयने एका अभ्यासानंतर या लसी १२ महिन्यांपर्यंत वापरण्यास योग्य असल्याचे म्हटले आहे. डीसीजीआयकडे सादर केलेल्या अभ्यासाच्या आकडेवारीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. लसींचा हा स्टॉक लहान मुलांच्या लसीकरण मोहिमेसाठी वापरला जाणार आहे.

देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आजपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणास सुरुवात झाली आहे. यात DGCI ने नुकतचं भारत बायोटेकच्य़ा कोवॅक्सीन लसीच्या वापराला मंजुरी दिली आहे. अशा परिस्थितीत लसींचा तुटवडा भरून काढण्यासाठी भारत बायोटेक हॉस्पिटलमध्ये ठेवलेला लसींचा स्टॉक परत मागवत आहे. या स्टॉकला पुन्हा रि-लेबल करुन विविध ठिकाणी पाठवला जाईल.


MHADA, MPSC Exam : म्हाडा, एपीएससी परीक्षेबाबत महत्त्वाची बातमी, ‘या’ दिवशी होणार दोन्ही परीक्षा


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -