घरCORONA UPDATECovaxin EUL मिळवण्याचा प्रयत्नात, भारत बायोटेकने ९० टक्के कागदपत्रे WHO ला सोपविली

Covaxin EUL मिळवण्याचा प्रयत्नात, भारत बायोटेकने ९० टक्के कागदपत्रे WHO ला सोपविली

Subscribe

यासंदर्भातील उर्वरित तपशीलही पुढील महिन्यात दिला जाईल.

देशात कोरोनाविरोधात लढण्यासाठी नागरिकांना सीरमची कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सीन ही लस दिली जात आहे. परंतु यातील कोव्हिशील्ड या लसीलाच जागतिक स्तरावर मान्यता आहे परंतु कोवॅक्सिन घेतलेल्य़ा नागरिकांना विदेशात प्रवास करताना अनेक अडचणी येत आहे. कारण कोवॅक्सिनला अद्याप जागतिक मान्यता मिळाली नाही. याच पार्श्वभूमीवर भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने कोवॅक्सिनला जागतिक मान्यता मिळवुण देण्यासाठी ९० टक्के कागदपत्रे WHO ला दिले असल्याची माहिती केंद्राला दिली आहे. जेणे करुन या लसीलाही विदेशात तात्कालीन वापरासाठी (EUL) परवानगी मिळेल. यासंदर्भातील उर्वरित तपशीलही पुढील महिन्यात दिला जाईल. यावर भारत बायोटेक कंपनीने म्हटले आहे की, (BBIL) अमेरिकेत छोट्या स्तरावर कोवॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीसाठी अमेरिकेच्या अन्न आणि औषध विभागाबरोबर अंतिम टप्प्यात चर्चा सुरु आहे. कोवॅक्सिनला WHO कडून EUL मिळवून देण्याच्या विषयावर भारत बायोटेकचे वरिष्ठ अधिकारी, आरोग्य मंत्रालय, जैव तंत्रज्ञान विभाग आणि परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात बैठक झाली.

कोव्हिशील्डला जागतिक स्तरावर आपत्कालीन वापराची परवानगी

WHO मधील EUL उत्पादनाची सुरक्षा आणि प्रभावीपणा प्रतिबिंबित करतो. यात पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूड निर्मित कोव्हिशील्ड लसीला WHO ने जागतिक स्तरावर आपत्कालीन वापरासाठी  मान्यता दिली आहे. त्यामुळे कोरोनाविरोधी लसीकरणाच्या जागतिक समान वितरण कार्यक्रम ‘कोवॅक्स’मध्ये लसींना समाविष्ठ करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता आवश्यक असते.

- Advertisement -

परराष्ट्र मंत्रालय सर्वतोपरी मदतीमुळे कोवॅक्सिन या लसीला जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन वापराच्या लसींच्या यादीत स्थान मिळेल असा विश्वास भारत बायोटेक कंपनीने व्यक्त केला आहे. यासाठी कोवॅक्सिन संबंधीत आवश्यक कागदपत्रांपैकी ९० टक्के कागदपत्रे जागतिक आरोग्य संघटनेला दिली असून उर्वरित कागदपत्रे जूनपर्यंत सादर केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान कोवॅक्सिन लसीच्या जागतिक मान्यतेसाठी भारत बायोटेक कंपनीने एप्रिलमध्ये WHO कडे EUL अर्ज केला आहे. याचदरम्यान कोवॅक्सिन लसीला ११ देशांकडून आधीच नियामक मान्यता मिळाली आहे. कोवॅक्सिनच्या उत्पादनासाठी सात देशांतील ११ कंपन्यांनी तंत्रज्ञान हस्तांतरणामध्ये मदत करण्यास तयारी दर्शवली आहे. यात ब्राझील आणि हंगेरीमध्ये कोवॅक्सिनच्या मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याचे भारत बायोटेकने स्पष्ट केले.

भारत बायोटेककडे दीर्घकालीन डेटा आहे

भाकर बायोटेक या देशांच्या नियामकांशी नियमित संपर्कात आहेत. यात भारत बायोटेकला आपल्या लसींवर पूर्ण विश्वास अनेक त्यांची कोवॅक्सिन ही लस घेतल्यानंतर सहा ते आठ महिन्यांनंतरही शरीरात एँटीबॉडीस जमा करत असल्याचे पुरावे सादर केले आहे. बीबीआयएलने बैठकीत स्पष्टीकरण दिले की सर्व नियामक मान्यता पूर्वीच्या आणि नंतरही प्रभावी असतील. “ते म्हणाले की, कोणत्याही देशाने ‘लसीकरण पासपोर्ट’ लागू केलेला नाही त्यामुळे जगातील प्रत्येक देशाची स्वतःची मान्यता प्रणाली आहे. बहुतेक देशांमध्ये जाण्यासाठी आरटीओ-पीसीआर तपासणीची रिपोर्ट निगेटिव्ह असणे बंधनकारक आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -