घरदेश-विदेशभारत बायोटेकच्या covaxin ला लवकरच मिळणार WHO ची मान्यता; आपत्कालीन वापरासाठी सोपविले...

भारत बायोटेकच्या covaxin ला लवकरच मिळणार WHO ची मान्यता; आपत्कालीन वापरासाठी सोपविले कागदपत्रे

Subscribe

भारत बायोटेकने विकसित केलेली Covaxin लस कोरोनाच्या अल्फा आणि डेल्टा व्हेरियंटला निष्क्रिय करत सर्वाधिक प्रभावी ठरत असल्याचा दावा अमेरिकच्या आरोग्य संघटनेने केला होता. त्यानंतर आता भारत बायोटेकने सोमवारी असे सांगितले की, कोरोनाच्या या लसीची आपातकालीन वापरासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जागतिक आरोग्य संघटनेकडे (डब्ल्यूएचओ) सोपविली आहेत आणि या लसीला लवकरच मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे. गेल्या आठवड्यात डब्ल्यूएचओचे आघाडीचे वैज्ञानिक सौम्य स्वामीनाथन यांनी सांगितले, डब्ल्यूएचओ चार ते सहा आठवड्यांत आपातकालीन वापराच्या यादीमध्ये Covaxin चा समावेश करण्याचा निर्णय घेऊ शकते.

भारत बायोटेक इंटरनेशनल लिमिटेडचे ​​अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “Covaxin च्या इमर्जन्सी यूज लिस्टिंग (ईयूएल) साठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे ९ जुलैपर्यंत जागतिक आरोग्य संघटनेला सादर केली गेली आहेत. आढावा प्रक्रिया सुरू झाली आहे आणि लवकरच आम्हाला डब्ल्यूएचओकडून मान्यता मिळण्याची आशा आहे.

- Advertisement -

ईयूएल ही डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यपद्धती दुरूस्त करण्याची प्रक्रिया आहे. हे सार्वजनिक किंवा आरोग्याच्या आपत्कालीन परिस्थितीत नवीन किंवा विना परवाना नसलेल्या उत्पादनांचा वापर करण्यास अनुमती देते. Covaxin सारख्या जागतिक सुविधा किंवा आंतरराष्ट्रीय खरेदीसाठी लस देणार्‍या कंपनीला लस पुरवण्यासाठी डब्ल्यूएचओ इमर्जन्सी यूज लिस्टिंग असणे आवश्यक आहे. दरम्यान, डब्ल्यूएचओने Pfizer-BioNTech, AstraZeneca- SK Bio/SII, Johnson & Johnson Janssen, Moderna आणि Sinopharm यांना आपत्कालीन वापरासाठी लसींना मान्यता दिली आहे. स्वदेशी लस अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटविरुद्ध ६३.६ टक्के कार्यक्षमता दर्शविते. कोव्हॅक्सिन गंभीर रोगसूचक कोविडच्या विरूद्ध ९३.४ टक्के आणि लक्षण विरहीत कोरोनाच्या विरूद्ध ६३.६ टक्के प्रभावी आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -