Corona Vaccine: केंद्र सरकारने भारत बायोटेकला ५५ लाख डोस खरेदी करण्याची दिली ऑर्डर

Covid UK to recognise Covaxin as an approved vaccine from November 22
खूशखबर! २२ नोव्हेंबरपासून 'कोवॅक्सिन'ला ब्रिटनमध्ये मान्यता, कोणत्याही निर्बंधांशिवाय करता येईल प्रवास

देशात लवकरच आता कोरोना लसीकरणाच्या मोहीमेला सुरुवात होणार आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूला ११ लाख ‘कोविशिल्ड’ लसीच्या डोसची पहिली ऑर्डर दिली होती. आता सरकारने भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीच्या ५५ लाख डोसची ऑर्डर दिली असल्याचे समोर आले आहे. मंगळवारी आयोजित केलेल्या आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेमध्ये सचिव राजेश भूषण म्हणाले की, ‘केंद्र सरकारने भारत बायोटेककडून ३८.५ लाख डोस २९५ रुपये प्रति डोसप्रमाणे खरेदी केली आहे. उर्वरित ‘कोव्हॅक्सिन’ १६.५ लाख डोस भारत बायोटेक केंद्र सरकारला मोफत दिली जाईल.

दरम्यान सीरम इन्स्टिट्यूटची ‘कोविशिल्ड’ ही लस सरकारने २०० रुपये प्रति डोस प्रमाणे खरेदी केली आहे. १४ जानेवारीपर्यंत सर्व लसीचे डोस राज्यांपर्यंत पोहोचतील. देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोठी मोहीम सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात २ कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना कोरोना लस दिली जाईल.

आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, ‘पंतप्रधान यांनी सोमवारी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सांगितले की, पहिल्या टप्प्यात ३ कोटी लोकांना लस दिली जाईल, ज्याचा खर्च राज्यांना द्यावा लागणार नाही, तर भारत सरकार हा खर्च करेल. योजनेनुसार, दुसऱ्या टप्प्यात ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना लस दिली जाईल. याशिवाय ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या आजारी लोकांना, ज्यांना जास्त संक्रमणाचा धोका आहे, त्यांना लस दिली जाईल.’


हेही वाचा – Corona Vaccine: ‘या’ लोकांनी लस घेताना एकदा नक्की विचार करा