घरदेश-विदेशभारत बायोटेकची Covaxin तिसर्‍या टप्प्यात ७७.८ टक्के प्रभावी; कंपनीचा दावा

भारत बायोटेकची Covaxin तिसर्‍या टप्प्यात ७७.८ टक्के प्रभावी; कंपनीचा दावा

Subscribe

तिसर्‍या टप्प्यात भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ७७.८ टक्के प्रभावी असल्याचे समोर आले आहे. कंपनीने गेल्या आठवड्यातच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (DCGI) चाचणी डेटा सादर केला होता. त्यावर मंगळवारी विषय तज्ज्ञ समितीची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. यामध्ये लस तिसर्‍या टप्प्यातील चाचणीचा डेटा मंजूर झाला. भारत बायोटेकच्या वतीने हा अहवाल केंद्र सरकारच्या समितीला सादर करण्यात आला आहे. तिसर्‍या टप्प्यातील माहिती मिळाल्यानंतरसब्जेक्ट एक्सपर्ट कमेटीने मंगळवारी बैठक घेतली. यामध्ये ही माहिती कोव्हॅक्सिनकडून दिली गेली.

तिसऱ्या टप्प्यातील चाचणी २५ हजार ८०० लोकांवर करण्यात आली. या चाचणीत हे दिसून आले की, ही लस कोरोनाविरूद्ध किती प्रभावी आहे. एसईसीच्या मान्यतेनंतर हा डेटा आता जागतिक आरोग्य संघटनेला सादर केला जाऊ शकतो. कोरोना संसर्ग झाल्यास रुग्णालयात दाखल होण्याच्या रूग्णांमध्ये १०० टक्के घट असल्याचे आकडेवारी दर्शविते. कोव्हॅक्सिन भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ICMR च्या संयुक्त विद्यमाने भारत बायोटेकने बनवले आहे. यासह, भारत बायोटेकचे पॅनेशिया बायोटेक, हेस्टर बायो आणि ज्युबिलंट फॉरनॉव यांच्याशी करार आहे.

- Advertisement -

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचा डेटा अद्याप आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त, पीयर-रिव्यू केलेल्या जर्नलमध्ये पूर्णपणे प्रकाशित केलेला नाही. भारत बायोटेक या महिन्याच्या सुरुवातीला असे म्हणाले की औषध नियामकांना सादर केल्यानंतर आणि साधारण तीन महिन्यांच्या मुदतीत हा डेटा प्रसिद्ध केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोव्हॅक्सिनला डब्ल्यूएचओ कडून जुलै ते सप्टेंबर दरम्यान आपत्कालीन वापराची मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. कंपनीने असे सांगितले की, ६० देशांमध्ये कोव्हॅक्सिनसाठी नियामक मान्यता सुरू आहेत. यामध्ये कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित अमेरिका आणि ब्राझीलचा समावेश आहे. मंजुरीसाठी डब्ल्यूएचओ-जिनेव्हामध्ये अर्जही देण्यात आला आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -