घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेट'द लॅन्सेट' सायन्सनुसार भारत बायोटेकची Covaxin लस सुरक्षित

‘द लॅन्सेट’ सायन्सनुसार भारत बायोटेकची Covaxin लस सुरक्षित

Subscribe

अशा प्रकारचा डेटा प्रकाशित करणारी भारत बायोटेक ही पहिली कोरोनाची लस तयार करणारी भारतीय कंपनी आहे.

भारत बायोटेकची Covaxin या लसीच्या फेज १ आणि फेज २चा संशोधन डेडा द लॅन्सेट या सायन्स नियतकालिकडे जमा केला होता. बायोटेक्सची covaxin ही लस वापरण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे यातून सांगण्यात आले आहे. पहिल्या फेजचा पुनरावलोकन डेटा द लॅन्सेट सायन्स नियतकालिकेत गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आला होता. अशा प्रकारचा डेटा प्रकाशित करणारी भारत बायोटेक ही पहिली कोरोनाची लस तयार करणारी भारतीय कंपनी आहे. या लसीमुळे लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याचे दिसून आले आहे. भारत बायोटेकने याबाबत ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

भारत बायटेकच्या पहिल्या फेजमध्ये एकूण ३७५ लोकांवर या लसीचा उपयोग केला गेला. लॅन्सेटने बायोटेकच्या पहिल्या फेजचा डेटा प्रसिद्ध करताना त्यात असे लिहिले आहे की, बायोटेकन तयार केलेल्या covaxin मुळे माणसाच्या शरीरात फार लवकर एन्टीबॉडीज तयार होतात. त्याचप्रमाणे T cell ही अधिक क्रियाशील होतात. माणसाच्या शरीरात तयार झालेल्या एन्टीबॉडी या माणसाच्या शरीरीत असलेल्या व्हायरसशी लढतात. हे एक प्रकारचे प्रोटीन आहे. कोणत्याही प्रकारच्या रोगाशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या T cell रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी आवश्यक असतात.


covaxin लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर ८२ ते ९२ टक्के लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाल्याचे दिसून आले. covaxin च्या तिसऱ्या फेजची ट्रायल सुरु आहे. २६ हजार लोकांमध्ये या लसीचा वापर करण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीचे गंभीर दुष्परिणाम झाल्यास BBIL कडून त्याची भरपाई देण्यात येईल असे भारत बायोटेककडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आरोग्य कर्मचाऱ्यांची कोरोना लस घेण्यास टाळाटा

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -