घरताज्या घडामोडीभारत बायोटेकच्या पहिल्या नोजल कोविड व्हॅक्सीनला मंजूरी

भारत बायोटेकच्या पहिल्या नोजल कोविड व्हॅक्सीनला मंजूरी

Subscribe

नवी दिल्ली: कोरोना विरुद्ध लढण्यासाठी एक आणखीन शस्त्रास्त्र तयार करण्यात आले आहे. भारत बायोटेकच्या पहिल्या नोजल कोविड व्हॅक्सीनला मंजूरी देण्यात आली आहे. भारत बायोटेकच्या सुई रहित इंट्रानेजल कोविड व्हॅक्सीनला 18 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींच्या सुरक्षतेसाठी या व्हॅक्सीनला मंजूरी देण्यात आली आहे. iNCOVACC ही जगभरातील पहिली इंट्रानासल लस बनली आहे.

हेटरोलोगस बूस्टर म्हणजे कोविडशील्ड किंवा कोव्हॅक्सीनचा डोस घेतलेल्या कोणत्याही व्यक्तीला ही विशेष इंट्रानासल लस बूस्टर डोस म्हणून दिली जाऊ शकते.

- Advertisement -

भारत बायोटेक कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, या विशिष्ट लसीची फेज III क्लिनिकल चाचणी देखील केली गेली होती, जी यशस्वी झाली. कंपनीने सांगितले की, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये सहभागी असलेल्या लोकांचेही मूल्यांकन करण्यात आले. भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एला यांनी अलीकडेच सांगितले होते की, फर्मने सुमारे 4,000 स्वयंसेवकांवर अनुनासिक लसीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण केल्या आहेत आणि आतापर्यंत साइड इफेक्टचे एकही प्रकरण नोंदवले गेले नाहीये.

भारतात कोरोना विषाणूचे 291 नवीन रुग्ण

- Advertisement -

देशात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4,46,71,853 वर पोहोचली आहे, तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 5 हजार 123 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये संसर्गामुळे प्राण गमावलेल्या लोकांच्या यादीत आणखी दोन प्रकरणं समाविष्ट झाल्यानंतर एकूण मृतांची संख्या 5,30,614 झाली आहे.


हेही वाचा : मुंबईसह ठाण्यात गोवरचा प्रादूर्भाव, राज्यभरात 10 हजार 234 संशयित रुग्ण


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -