घरदेश-विदेशभारत जोडो यात्रा : बुटाची लेस बांधण्यावरून भाजपाचा आरोप, काँग्रेसकडून इशारा

भारत जोडो यात्रा : बुटाची लेस बांधण्यावरून भाजपाचा आरोप, काँग्रेसकडून इशारा

Subscribe

नवी दिल्ली : कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता, नियमांचे काटेकोरपणे पालन करा, अन्यथा भारत जोडो यात्रा पुढे ढकला, असे पत्र केंद्र सरकारने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना पाठवल्यावरून काँग्रेसने त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. आता त्यांच्या या यात्रेदरम्यान एका माजी केंद्रीय मंत्र्याने बुटाची लेस बांधण्यावरून भाजपाने आरोप केला आहे. तर, काँग्रेसने यावरून कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

जगभरात कोरोनाची दहशत पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेबद्दल पत्रही लिहिले आहे. कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे आणि मास्क-सॅनिटायझरचा वापर करावा. या यात्रेत लसीकरण झालेल्या नागरिकांनाच सहभागी करून घ्यावे. या यात्रेत सहभागी होण्यापूर्वी आणि नंतर नागरिकांना आयसोलेट करण्यात यावे. हे नियम पाळण्यात काही अडचण आल्यास लोकांचे आरोग्य लक्षात घेऊन ही यात्रा काही काळ पुढे ढकलली जाऊ शकते, असा सल्ला या पत्रातून राहुल गांधी यांना केंद्राने दिला आहे.

- Advertisement -

त्यापाठोपाठ आता, भाजपा नेते अमित मालवीय एक ट्वीट करून माजी केंद्रीय मंत्री आणि राजस्थानमधील अलवर येथील काँग्रेस नेते जितेंद्र सिंह यांनी राहुल गांधी यांच्या बुटाच्या लेस बांधल्याचा दावा केला आहे. राहुल गांधींच्या बुटाची लेस बांधण्यासाठी जितेंद्र सिंह हे गुडघ्यावर खाली बसले. स्वत: लेस बांधण्याऐवजी, एक गर्विष्ठ नेता त्यांची पाठी थोपटताना दिसतो… अशा आशयाचे हे ट्वीट आहे.

तर, जितेंद्र सिंह यांनी देखील ट्विटरवरून या प्रकरणावर खुलासा केला आहे. सत्ताधारी भाजपाच्या राष्ट्रीय माहिती विभागाचे प्रमुख म्हणून तुमचे ट्वीट पूर्णपणे असत्यावर आधारित आणि बदनामीकारक आहे. सत्य हे आहे की, माझ्या विनंतीवरून राहुलजी काही काळ थांबले जेणेकरून मी माझ्या बुटाची लेस बांधू शकेन, असे सांगत जितेंद्र सिंह यांनी, हे ट्विट हटवून राहुल गांधींची माफी मागा किंवा कायदेशीर कारवाईला सामोरे जा, असा इशारा दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -