घरताज्या घडामोडीभारत जोडो यात्रेला ब्रेक, पठाणकोटहून राहुल गांधी पुन्हा दिल्लीत

भारत जोडो यात्रेला ब्रेक, पठाणकोटहून राहुल गांधी पुन्हा दिल्लीत

Subscribe

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला संपूर्ण भारतातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ही यात्रा सध्या जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचली आहे. परंतु राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला ब्रेक लागणार असून पठाणकोटहून ते पुन्हा एकदा दिल्लीत पोहचणार असल्याची माहिती मिळाली आहे.

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला कठुआपासून दहा किलोमीटर अंतरानंतर परत पाठवण्यात आले आहे. जम्मू-काश्मीर प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला आहे. राहुल गांधींचा ताफाही परत आल्याचे सांगितले जात आहे. सुरक्षा व्यवस्थेमुळे पठाणकोट जिल्हा पोलिसांनी पठाणकोट-जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची वाहतूक बंद केली आहे. परंतु राहुल गांधी दिल्लीत पुन्हा एकदा का जात आहेत?, यावर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

- Advertisement -

भारत जोडो यात्रेला दोन दिवसांनंतर म्हणजे २२ जानेवारी रोजी सुरुवात होणार आहे. यावेळी २४ जानेवारी रोजी राहुल गांधी जम्मूमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी पठाणकोट विमानतळावरून माधोपूरमार्गे दिल्लीला रवाना झाले आहेत.

या दौऱ्यात राहुल गांधी जॅकेटमध्ये

- Advertisement -

राहुल गांधींच्या टी-शर्टवरून सुरू झालेला वाद आज संपला. यात्रेच्या १२५ व्या दिवशी राहुल गांधींनी टी-शर्टवर जॅकेट घातले होते. कठुआ येथील हटली मोढ येथून प्रवास सुरू करताना राहुल गांधी जॅकेटमध्ये दिसले होते. प्रवासादरम्यान हवामान बिघडलं होतं. थंड वाऱ्यासह हलका पाऊस पडत होता. या यात्रेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील सहभाग घेतला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी खासदार संजय राऊत हे जम्मूला आले आहेत. यावेळी त्यांनी शिवसेना जम्मूमध्ये विधानसभेच्या निवडणुका लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसेच देशात काँग्रेसला वगळून विरोधी पक्षांची आघाडी होऊच शकत नाही, असंही संजय राऊत यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना सुनावलं आहे.


हेही वाचा : दादरनंतर आता शिंदे गटाचा नाशिकमध्ये हवेत गोळीबार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -