राहुल गांधींची भर पावसात सभा; शरद पवारांच्या ‘त्या’ सभेची झाली आठवण

bharat jodo yatra congress leader rahul gandhi continues speech amid rain in maysuru watch video

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर असलेले पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी दररोज वेगवेगळ्या सभांना संबोधित करत आहेत. ही यात्रा आता भाजपशासित कर्नाटक राज्यात पोहचली आहे. रविवारी कर्नाटकातील यात्रेचा तिसरा दिवस होता. कर्नाटक दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी राहुल गांधींची काहीशी वेगळे शैली म्हैसूरमध्ये पाहायला मिळाली. त्यांची सभा सुरु असताना अचानक पाऊस सुरु झाला. यावेळी भर पावसात भिजत राहुल गांधी सभेला संबोधित करत राहिले. राहुल गांधी मुसळधार पावसात सभेला संबोधित करतानाचा व्हिडिओही समोर आला आहे. राहुल गांधींच्या पावसातील या सभेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्या 2019 च्या त्या सभेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेसाठी राहुल गांधी संपूर्ण भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी दररोज वेगवेगळ्या सभेला संबोधित करत असतात. कर्नाटक दौऱ्याच्या रविवारच्या तिसऱ्या दिवशी ते आज म्हैसूरला गेले होते. यावेळी त्यांचा काहीसा वेगळा अंदाज पाहयला मिळाला. राहुल गांधी सभेला संबोधित करत असताना अचानक पाऊस सुरु झाला, मात्र धो धो पाऊस सुरु असतानाही राहुल गांधींनी आपले भाषण थांबवले नाही. तर पावसात भिजत सभेला संबोधित करत राहिले. त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ आता तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या पावसातील या सभेमुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सातारा येथे जाहीर सभेला संबोधित करत होते. यावेळी मध्येच धो- धो पाऊस सुरु झाला. 79 वर्षीय शरद पवार पावसानंतरही मागे हटले नाहीत आणि मंचावर उभे राहून उपस्थितांना संबोधित करत राहिले. यावेळी त्यांनी छ्त्री घेण्यासही नकार दिला. यावेळी वरूण राजाने राष्ट्रवादीला आशीर्वाद दिला आहे. त्यांच्या आशीर्वादाने सातारा जिल्हा आता आगामी निवडणुकीत जादू करेल. असंही पवार म्हणाले. यानंतर निवडणुकीत उदयन राजे यांचा पराभव झाला होता.

राहुल गांधींच्या बाबतीतही असंच झालंय आणि त्यांनीही असंच काहीसं म्हटलं आहे. राहुल म्हणाले की, भारताला एकत्र करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. भारताचा आवाज उठवण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. कन्याकुमारी ते काश्मीर जाणार, भारत जोडी यात्रेला कोणीही रोखू शकत नाही. असही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधींचा व्हिडीओ समोर येताच काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी कौतुकाचे पूल बांधण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी राहुल गांधी पावसात भिजताना जाहीर सभेला संबोधित करतानाचा व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, गांधी जयंतीच्या संध्याकाळी म्हैसूरमध्ये मुसळधार पाऊस असतानाही राहुल गांधी लोकांना संबोधित करत आहेत. भारत जोडो यात्रेला द्वेषाच्या विरोधात बेरोजगारी आणि महागाईच्या विरोधात बोलण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकत नाही.

त्याचवेळी राहुल यांचा हा व्हिडिओ काँग्रेस पक्षाच्या ट्विटर हँडलवरूनही शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये कोणतीही सबब लिहिलेली नाही. फक्त आवड. भारत जोडो यात्रेला ध्येय गाठण्यापासून कोणताही अडथळा रोखू शकत नाही.


गोव्यावरून दारू आणणाऱ्यांची आता खैर नाही! शिंदे सरकार दाखल करणार मकोकाअंतर्गत गुन्हा