घरदेश-विदेशभारत जोडो यात्रा : भाजपा कार्यकर्त्यांना राहुल गांधी म्हणाले, 'जय सियाराम' आणि...

भारत जोडो यात्रा : भाजपा कार्यकर्त्यांना राहुल गांधी म्हणाले, ‘जय सियाराम’ आणि…

Subscribe

जयपूर : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज, शुक्रवारी 100वा दिवस आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेला शुक्रवारी दौसाच्या नांगल राजावतानमधील मीणा उच्च न्यायालय येथून सुरुवात झाली. रस्त्यात त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना ‘जय सियाराम’ म्हणाले आणि त्यांच्याकडून येणाऱ्या प्रतिसादावर टिप्पणी केली.

भारत जोडो यात्रेला गेल्या 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरुवात झाली. सध्या ही  यात्रा राजस्थानमध्ये आहे. शुक्रवारी सकाळी या यात्रेला सुरुवात झाल्यानंतर या यात्रेच्या मार्गावर भाजपाचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या गच्चीवर उभे राहून भाजपा कार्यकर्ते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पाहात होते. राहुल गांधी यांचे त्यांच्याकडे लक्ष जाताच, त्यांनी आधी त्यांना हात उंचावून दाखवला, त्यावर काही भाजपा कार्यकर्त्यांनी देखील त्यांना प्रतिसाद दिला. नंतर राहुल गांधी यांनी हातानेच खुणावत, ‘नमस्ते, करायला या’ असे सांगितले.

- Advertisement -

मग अचानक या भाजपा कार्यकर्त्यांकडे पाहात राहुल गांधी ‘जय सियाराम’ची घोषणा दिली. त्यावर या कार्यकर्त्यांनी देखील घोषणा दिली. पुन्हा ‘जय सियाराम’ची घोषणा देऊन राहुल गांधी म्हणाले, ‘जय श्रीराम’ नव्हे ‘जय सियाराम’! हा 25 सेकंदांचा हा व्हिडीओ काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.

- Advertisement -

भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपामध्ये महिलांना प्रोत्साहन दिले जात नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ‘जय सियाराम’ नाही तर ‘जय श्रीराम’ म्हणतात. असे करून ते सीतादेवीचा अपमान करतात. जय सियाराम म्हणण्याने प्रभू राम आणि सीता देवी दोघांचाही आदर होतो, असे त्यांनी म्हटले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -