घरदेश-विदेशअखेर राहुल गांधींनी यात्रेत टी-शर्ट घालण्यामागचं खरं कारण सांगितलंच...

अखेर राहुल गांधींनी यात्रेत टी-शर्ट घालण्यामागचं खरं कारण सांगितलंच…

Subscribe

राहुल गांधींनी आपली संपूर्ण भारत जोडो यात्रा पांढऱ्या टी-शर्टमध्ये पूर्ण केली. इतक्या कडाक्याच्या थंडीत सुद्धा राहुल गांधीचं टी-शर्ट घालणं हे फारच चर्चेत आलं होतं. राहुल गांधींच्या टी-शर्टवरूनही बरंच राजकारणही झालं.

Rahul Gandhi T Shirt Big Controversy : राहुल गांधींनी आपली संपूर्ण भारत जोडो यात्रा पांढऱ्या टी-शर्टमध्ये पूर्ण केली. याची सुरुवात केरळपासून झाली, जिथे खूप दमट वातावरण होते. ही यात्रा उत्तरेकडील राज्ये आणि राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचल्याने राहुल गांधींना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागला. इतक्या कडाक्याच्या थंडीत सुद्धा राहुल गांधीचं टी-शर्ट घालणं हे फारच चर्चेत आलं होतं. राहुल गांधींच्या टी-शर्टवरूनही बरंच राजकारणही झालं. अखेर राहुल गांधींनी यामागचं कारण सांगितलं. यापूर्वी त्यांनी त्यांच्या टी-शर्ट घालण्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. पण यंदा सांगितलेला किस्सा हा काहीसा वेगळा आहे.

तामिळनाडूपासून सुरु झालेला त्यांचा हा प्रवास १४ राज्य ओलांडून तब्बल ३९७० किमी इतका प्रवास करून आता जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे पोहोचली. तिथंच या यात्रेचा समारोप होणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. सर्वसामान्यांशी संवाद साधत त्यांनी हा प्रवास इथवर आणला, अनेकांना यासाठी त्यांचा हेवाही वाटला. यादरम्यान राहुल गांधींचा पांढरा टी-शर्ट प्रचंड चर्चेत होता. त्याच्या टी-शर्ट घालण्यावरही लोकांनी प्रश्न उपस्थित केले होते. आज अखेर राहूल गांधींनी टी शर्ट घालण्यामागचं खरं कारण सांगितलं.

- Advertisement -
हे आहे खरं कारण…

याबाबत राहुल गांधींनी सांगितले की, “भारत जोडो यात्रेदरम्यान मध्य प्रदेशातील चार गरीब मुला-मुलींना फाटक्या कपड्यांमध्ये थरथर कापताना पाहिलं होतं. ते चौघे जण मजुर असल्याचं दिसून येत होतं. त्यांच्या अंगावर खूप माती चिकटलेली दिसत होती. मी खाली वाकून चारही मुलांना मिठी मारली. त्यावेळी हिवाळा सुरू झाला होता, पण त्या चार मुलांनी कपडेही घातले नव्हते, थंडीने थरथर कापत होते. त्या मुलांकडे पाहून असं वाटलं की त्यांनी अन्नही खाल्ले नसेल. त्यांना पाहून माझ्या लक्षात आलं की, जर ही मुले स्वेटर किंवा जॅकेट घालत नसतील तर मी ही नको घालायला.”

- Advertisement -

“ते तुमच्या आणि  माझ्याहीपेक्षा साफ आहेत…” – राहुल गांधी

यापुढे बोलताना ते म्हणाले, “मी हे सांगण्यास कचरत होतो, कारण त्यावेळी माझ्यासोबत जी व्यक्ती होती, त्याने मला सांगितले की ही मुले घाणेरडी आहेत, तुम्ही त्यांच्या जवळ जाऊ नका. तेव्हा मी त्याला सांगितले की माझा या सगळ्यावर विश्वास नाही, मी म्हणालो. तुमच्या आणि माझ्यापेक्षाही ते स्वच्छ आणि साफ आहेत.”

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा दिल्लीत पोहोचल्यावर पत्रकार परिषदेत त्यांना कडाक्याच्या थंडीतही स्वेटर किंवा जॅकेट का घालत नाही, असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, मला थंडीची भीती वाटत नाही. ज्याला थंडीची भीती वाटते तो स्वेटर घालतात.राहुल गांधींप्रमाणेच जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही बनिहाल ते काझीगुंड असा पांढरा टी-शर्ट घालून प्रवास केला. दोन्ही नेत्यांनी एकसारखे टी-शर्ट घातलेले दिसले. त्याच्यासोबत चालणाऱ्या लोकांनी अनेक कपडे घातले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -