घरदेश-विदेशBharat Ratna Benefits : मरणोत्तर भारतरत्न मिळालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना काय मिळतं?

Bharat Ratna Benefits : मरणोत्तर भारतरत्न मिळालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना काय मिळतं?

Subscribe

केंद्र सरकारने आज 9 फेब्रुवारी रोजी देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, माजी पंतप्रधान नरसिंह राव आणि महान कृषी शास्त्रज्ञ डॉ. एमएस स्वामीनाथन यांना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट 'X' (पूर्वीचे ट्विटर) ट्विट करून ही माहिती दिली आहे. तसेच तीन महान व्यक्तींच्या योगदानाबद्दल सांगताना भारतरत्न देण्याची घोषणा केली.

नवी दिल्ली : भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. कला, साहित्य, विज्ञान, लोकसेवा आणि क्रीडा अशा राष्ट्रसेवेसाठी हा सन्मान दिला जातो. आपल्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्य आणि योगदानाद्वारे देशाला गौरव मिळवून देणाऱ्या लोकांना भारतरत्न दिला जातो. मात्र, मरणोत्तर भारतरत्न मिळालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला कोणत्या सुविधा मिळताता हा प्रश्न अनेकांना पडला असेल. चला तर जाणून घेऊया त्याविषयी. (Bharat Ratna Benefits What does the family of a Bharat Ratna recipient get after death read)

केंद्र सरकारने आज 9 फेब्रुवारी रोजी देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, माजी पंतप्रधान नरसिंह राव आणि महान कृषी शास्त्रज्ञ डॉ. एमएस स्वामीनाथन यांना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) ट्विट करून ही माहिती दिली आहे. तसेच तीन महान व्यक्तींच्या योगदानाबद्दल सांगताना भारतरत्न देण्याची घोषणा केली.

- Advertisement -

देशाच पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या मर्यादेत आणि ग्रामीण वातावरणात व्यतीत केले आहे. 29 मे 1987 रोजी वयाच्या 84 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. पी.व्ही. नरसिंह राव हे भारताचे 9 वे पंतप्रधान होते, जे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले होते. 23 डिसेंबर 2004 रोजी वयाच्या 83 व्या वर्षी त्यांचे निधन झाले, तर हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉ. एमएस स्वामीनाथन यांनी 28 सप्टेंबर 2023 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आता प्रश्न पडतो की, मरणोत्तर भारतरत्न मिळाल्यावर काय होते? भारतरत्न मिळाल्यानंतर कोणत्या सुविधा मिळतात? त्यांच्या कुटुंबियांना काय फायदा होतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया.

हेही वाचा : PM Modi : ‘SPG ने नकार दिल्यानंतरही गेलो होतो पाकिस्तानात’; PM मोदींनी खासदारांना सांगितला किस्सा

- Advertisement -

इतर अनेक पुरस्कारांप्रमाणे भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान प्राप्त व्यक्तीला एकही पैसा दिला जात नाही. मात्र अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित व्यक्ती कोणत्याही राज्यात गेल्यास तेथील सरकार त्यांचे राज्याचे पाहुणे म्हणून स्वागत करते. त्यांना राज्यात प्रवासाची, राहण्याची सोय केली जाते. नियमांनुसार विस्तारित संरक्षण देखील दिले जाते. भारतरत्न प्राप्तकर्त्यांना महत्त्वाच्या सरकारी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाते. सरकार भारतरत्न प्राप्तकर्त्यांना वॉरंट ऑफ प्रेसीडेंसीमध्ये स्थान देते, ज्याचा उपयोग सरकारी कार्यक्रमांमध्ये प्राधान्य देण्यासाठी केला जातो.

हेही वाचा : Raj Thackeray : बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न घोषित करा, राज ठाकरेंची मागणी

भारतीय राज्यघटनेच्या कलम 18(1) नुसार, पुरस्कार प्राप्तकर्ते त्यांच्या नावाचा उपसर्ग किंवा प्रत्यय म्हणून ‘भारतरत्न’ वापरू शकत नाहीत. ते त्यांच्या बायोडाटा, व्हिजिटिंग कार्ड, लेटर हेड इत्यादीमध्ये ‘राष्ट्रपतींनी दिलेला भारतरत्न’ किंवा ‘भारतरत्न पुरस्कार प्राप्तकर्ता’ जोडू शकतात.

मरणोत्तर सन्मान मिळाल्यास कुटुंबासाठी लागू होतात हे नियम

जर एखाद्या व्यक्तीला मरणोत्तर भारतरत्न दिला तर त्याला दिलेला भारतरत्न जोडून त्याचे नाव घेतले जाते. राज्य सरकार त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना जसे की पती, पत्नी आणि मुले यांना पाहुण्यांच्या सुविधा पुरवते. त्यांना वैयक्तिक कर्मचारी आणि चालकही दिला जातो. मात्र, कुटुंबाच्या सोयीसुविधांबाबत अद्याप कोणतीही लेखी सूचना देण्यात आलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -