घरदेश-विदेशBharat Ratna : राम मंदिराच्या लढ्यातील दोन्ही शिलेदारांना भारतरत्न; वाचा सविस्तर...

Bharat Ratna : राम मंदिराच्या लढ्यातील दोन्ही शिलेदारांना भारतरत्न; वाचा सविस्तर…

Subscribe

22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या मंदिराच्या उभारणीचा प्रवास बराच मोठा आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी हजारो कारसेवकांनी येथे असलेली बाबरी मशीद पाडली होती. जेव्हा ही मशीद पाडली जात होती तेव्हा कल्याण सिंह उत्तर मुख्यमंत्री होते आणि पी.व्ही. नरसिंह राव केंद्रात पंतप्रधान होते.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (9 फेब्रुवारी) देशाचे माजी पंतप्रधान आणि आर्थिक सुधारणांसाठी प्रसिद्ध नरसिंह राव यांच्यासह डॉ. स्वामीनाथन आणि चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली. याआधी माजी उपपंतप्रधान आणि ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणाही करण्यात आली होती. आडवाणी आणि राव या दोन्ही नेत्यांमधील एक समानता आहे. ती म्हणजे म्हणजे दोघेही राम मंदिराचे समर्थक म्हणून ओळखले जातात हे विशेष. (Bharat Ratna Bharat Ratna to both sculptors of Ram temple battle Read more)

22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या मंदिराच्या उभारणीचा प्रवास बराच मोठा आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी हजारो कारसेवकांनी येथे असलेली बाबरी मशीद पाडली होती. जेव्हा ही मशीद पाडली जात होती तेव्हा कल्याण सिंह उत्तर मुख्यमंत्री होते आणि पी.व्ही. नरसिंह राव केंद्रात पंतप्रधान होते.

- Advertisement -

हेही वाचा : Nana Patole: राज्यकर्त्यांसोबत गुंड फिरतात, हे गुंडांचं सरकार आहे का? नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल

मशीद जाणीवपूर्वक पाडल्याचा आरोपही तत्कालीन पंतप्रधानांवर झाला होता. अयोध्येत मशीद पाडली जात असताना नरसिंह राव तासनतास पूजा करत बसले, असा दावा काही लोकांनी केला. दिवंगत पत्रकार कुलदीप नय्यर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तक ‘बियॉन्ड द लाइन्स’मध्येही याचा उल्लेख केला होता. त्यांनी लिहिले होते की, समाजवादी नेते मधु लिमये यांनी मला सांगितले की, पूजेच्या वेळी नरसिंह राव यांच्या एका सहकाऱ्याने त्यांच्या कानात कुजबुज केली की, मशीद पाडली गेली आहे, काही सेकंदातच पंतप्रधान पूजा पूर्ण करून उठले. मशीद पाडल्याच्या वेळी ते तासंतास पूजेत बसून होते. त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या सहकाऱ्यांना पूजेदरम्यान त्रास देऊ नये, अशा सूचना दिल्या. मात्र, नरसिंह राव यांचे पुत्र पी.व्ही. रंगा राव यांनी या दाव्यांचे पूर्णपणे खंडन केले.

- Advertisement -

हेही वाचा : Dahisar Firing : घोसाळकर गोळीबार प्रकरण; विरोधकांच्या निशाण्यावर सत्ताधारी

या शब्दांत मोदींनी केलं पी.व्ही. नरसिंह राव यांचं कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांच्याविषयी केलेल्या ट्वीटमध्ये लिहिले की, माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती देताना आनंद होत आहे. एक प्रतिष्ठित विद्वान आणि राजकारणी म्हणून नरसिंह राव यांनी देशाची मोठ्या प्रमाणावर सेवा केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि अनेक वर्षे संसद व विधानसभा सदस्य या नात्याने त्यांनी केलेल्या कामामुळे ते आजही स्मरणात आहेत. भारताला आर्थिकदृष्ट्या प्रगत बनविण्यात आणि देशाच्या समृद्धी आणि विकासाचा भक्कम पाया रचण्यात त्यांचे दूरदर्शी नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरले अशा आशयाचे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांच्याविषयी केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -