घरदेश-विदेशBharat Ratna : चौधरी चरण सिंह, पी.व्ही. नरसिंह राव यांच्यासह डॉ. स्वामीनाथन यांना भारतरत्न

Bharat Ratna : चौधरी चरण सिंह, पी.व्ही. नरसिंह राव यांच्यासह डॉ. स्वामीनाथन यांना भारतरत्न

Subscribe

केंद्र सरकारने माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि पी.व्ही. नरसिंह राव यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा केली आहे. शास्त्रज्ञ डॉ. एमएस स्वामीनाथन यांनाही भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि पी.व्ही. नरसिंह राव यांच्यासह हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. स्वामीनाथ यांना यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा केली आहे. (Bharat Ratna Chaudhary Charan Singh, P.V. Narasimha Rao along with Dr. Bharat Ratna to Swaminathan)

केंद्र सरकारने माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि पी.व्ही. नरसिंह राव यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा केली आहे. शास्त्रज्ञ डॉ. एमएस स्वामीनाथन यांनाही भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर याची घोषणा केली. यापूर्वी हा सन्मान बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. अडवाणी वगळता इतर चारही व्यक्तिमत्त्वांना हा सन्मान मरणोत्तर देण्यात येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Uday Samant : राष्ट्रपती राजवट लावा म्हणण्याचा अधिकारच नाही- उदय सामंत

- Advertisement -

काय म्हणाले पंतप्रधान डॉ. स्वामीनाथन यांच्याविषयी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न सन्मानाची घोषणा त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट X वरुन केली. यामध्ये त्यांनी लिहिले की, भारत सरकार डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांना आपल्या देशासाठी कृषी आणि शेतकरी कल्याणात दिलेल्या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन त्यांना भारतरत्न प्रदान करण्यात येत आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. आव्हानात्मक काळात भारताला कृषी क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी मदत करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि देशाच्या शेतीच्या आधुनिकीकरणासाठी उत्कृष्ट प्रयत्न केले. एक नवोदित आणि मार्गदर्शक आणि अनेक विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण आणि संशोधनाला प्रोत्साहन देणारे त्यांचे अमूल्य कार्य आहे. डॉ. स्वामीनाथन यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने केवळ भारतीय शेतीचाच कायापालट केला नाही तर देशाची अन्न सुरक्षा आणि समृद्धीही सुनिश्चित केली आहे. असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

हेही वाचा : Ghosalkar Murder: ‘आय किल्ड अभिषेक’, माॉरिस ओरडला; वाचा गोळीबाराचा थरार

देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येत आहे. हे आमच्या सरकारचे भाग्य आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असोत वा देशाचे गृहमंत्री असोत त्यांनी राष्ट्र उभारणीला नेहमीच गती दिली आणीबाणीच्या विरोधातही ते ठामपणे उभे राहिले. त्यांचे आमच्या शेतकरी बंधू-भगिनींप्रती असलेले समर्पण आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी संपूर्ण देशाला प्रेरणादायी आहे असे लिहिले ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

हेही वाचा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना कामातून दिले उत्तर | Eknathn Shinde

पी.व्ही. नरसिंह राव यांच्याविषयी काय म्हणाले पंतप्रधान?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांच्याविषयी केलेल्या ट्वीटमध्ये लिहिले की, माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती देताना आनंद होत आहे. एक प्रतिष्ठित विद्वान आणि राजकारणी म्हणून नरसिंह राव यांनी देशाची मोठ्या प्रमाणावर सेवा केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि अनेक वर्षे संसद व विधानसभा सदस्य या नात्याने त्यांनी केलेल्या कामामुळे ते आजही स्मरणात आहेत. भारताला आर्थिकदृष्ट्या प्रगत बनविण्यात आणि देशाच्या समृद्धी आणि विकासाचा भक्कम पाया रचण्यात त्यांचे दूरदर्शी नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरले अशा आशयाचे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांच्याविषयी केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -