Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर राजकारण कर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३ भाजपाच्या The Karnataka Story चा The End; दक्षिणेचे दरवाजे झाले बंद

भाजपाच्या The Karnataka Story चा The End; दक्षिणेचे दरवाजे झाले बंद

Subscribe

Karnataka Assembly Election 2023 कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा (Congress) दणदणीत विजय झाला आहे. ‘द केरला स्टोरी’, बजरंगबली, हिजाब, साप आणि नालायक यासारखे नॉन इश्यूजला इश्यूज करण्याचा भाजपाचा प्रयत्न कर्नाटकच्या जनतेने निकाली काढल्याचे काँग्रेस नेते म्हणत आहेत. कर्नाटकात भाजपचा झालेला पराभव हा त्यांचा दक्षिण भारतातील प्रवेश रोखणारा मानला जात आहे. दक्षिण भारताने आता भाजपसाठी आपले दरवाजे कायमचे सीलबंद केले असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलं आहे.

कर्नाटकच्या मतदारांनी धार्मिक ध्रुवीकरण आणि फुटीरतावादी राजकारणापेक्षा विकास आणि धर्मनिरपेक्षता निवडली आहे, याचे समाधान असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले.
कर्नाटकातील पराभव म्हणजे पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेची घसरण म्हणून पाहिले पाहिजे. हा पंतप्रधानांचा वैयक्तिक पराभव आणि सर्व धर्मनिरपेक्ष शक्तींचा विजय आहे. आता मतदार जुमला किंवा कोणत्याही प्रकारच्या धार्मिक ध्रुवीकरणाला बळी पडत नाहीत, हे या निवडणुकीने दाखवून दिल्याचे तपासे म्हणाले.

- Advertisement -

कर्नाटक निवडणुकीच्या निकालांनी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत यूपीएच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा केला आहे, और अब दिल्ली दूर नही अशी भावना सध्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या गोटातून व्यक्त होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक निवडणूक प्रचारात द केरला स्टोरी या चित्रपटाचा उल्लेख केला होता. या चित्रपटाला काँग्रेस विरोध करत असल्याचे सांगत त्यांच्या विरोधाला थेट दहशतवादाला समर्थनाशी पंतप्रधानांनी जोडले होते. धार्मिक ध्रुवीकरणाचा पंतप्रधानांचा हा प्रयत्न कन्नडिगांनी हाणून पाडला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सत्ते आल्यानंतर पीएफआय आणि बजरंग दल या संघटनांवर बंदीचे आश्वासन दिले. तेव्हा पंतप्रधान मोदी आणि भाजपने बजरंग दलाची तुलना थेट बजरंगबली हनुमानाशी करत काँग्रेसने हुनमानाचा अपमान केल्याची प्रचार सुरु केला होता, त्यालाही कर्नाटकच्या जनतेने सपशेल नाकारल्याचे आजच्या निकालातून स्पष्ट होत आहे.

- Advertisement -

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही कर्नाटक विजयाबद्दल बोलताना कर्नाटकच्या जनतेने द्वेषाचा बाजार बंद करुन प्रेमाचे दुकान सुरु केल्याचे म्हटले आहे.
हिजाब बंदी, लव जिहाद यासारखे दोन समुदायात द्वेष आणि तेढ निर्माण करणारे मुद्दे उपस्थित करुन भाजप आपली राजकीय पोळी भाजते, ते आता जनतेनेच नाकारल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटले आहे.

दक्षिणेचे द्वार बंद
भारतीय जनता पक्ष हा हिंदी भाषिक पट्ट्यात वाढलेला पक्ष आहे. दक्षिणेतील त्यांच्या प्रवेशासाठी कर्नाटक जिंकणे महत्त्वाचे होते. गेल्या काही दशकांपासून भाजपने कर्नाटकात आपला जम बसवला आहे. मात्र अद्यापही त्यांना तेलंगाणा, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू या राज्यात प्रवेश मिळालेला नाही. कर्नाटकातील पराभवामुळे भाजपसाठी आता दक्षिणेचे द्वार बंदच होणार का, असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

‘या’ १० राज्यात भाजपाची सत्ता
गुजरात, हरियाणा, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, गोवा, मणिपूर, महाराष्ट्र

काँग्रेस
राजस्थान, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, कर्नाटक

ना काँग्रेस, ना भाजप
१. पंजाब – आप
२. दिल्ली – आप
३. ओडिशा – बीजू जनता दल
४. केरळ – सीपीएम
५. पश्चिम बंगाल – तृणमूल काँग्रेस
६. आंध्र प्रदेश – वायएसआर काँग्रेस
७. तेलंगाणा – भारत राष्ट्र समिती
८. सिक्किम – सिक्की क्रांतिकारी मोर्चा
९. मिझोरम – मिजो नॅशनल फ्रंट
१०. तामिळनाडू – डीएमके

- Advertisment -