घरदेश-विदेशBharatPe : 81 कोटींच्या फसवणूक प्रकरणी भारतपेच्या माजी एमडीविरोधात एफआयआर

BharatPe : 81 कोटींच्या फसवणूक प्रकरणी भारतपेच्या माजी एमडीविरोधात एफआयआर

Subscribe

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (Economic Offences Wing) बुधवारी (10 मे) भारतपेचे (BharatPe) माजी व्यवस्थापकीय संचालक (former Managing Director) अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) आणि त्यांची पत्नी माधुरी जैन ग्रोव्हर (Madhuri Jain Grover) यांच्याविरुद्ध फसवणुकीच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे. 81 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीच्या आरोपावरून अश्नीर ग्रोव्हर आणि माघुरी जैन यांच्यासह दीपक गुप्ता, सुरेश जैन आणि श्वेतांक जैन यांच्यासह कुटुंबातील सदस्यांविरुद्धही एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

आर्थिक गुन्हे शाखेकडे यासंदर्भात तक्रार प्राप्त झाली होती आणि त्यानुसार या सर्व व्यक्तींबाबत तपास करण्यात आला. त्यानंतर या सर्वांविरोधात 406, 408, 409, 420, 467, 468, 471 आणि 120B या कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या वर्षी मार्चमध्येच ग्रोव्हरला कंपनीने केले होते बडतर्फ
गेल्या सहा महिन्यांत पाच प्रकरणांमध्ये ग्रोव्हरचे नाव समोर आले आहे. जानेवारी 2022मध्ये आर्थिक अनियमिततेचे आरोप त्यांच्यावर करण्यात आल्यानतंर त्याची भारतपेशी कायदेशीर लढाई सुरू आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये ग्रोव्हरला कंपनीतून काढून टाकण्यात आले होते.

- Advertisement -

डिसेंबर 2022मध्ये, दिल्लीस्थित फिनटेक युनिकॉर्नने ग्रोव्हर आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे फौजदारी तक्रार दाखल केली, ज्यात 81.28 कोटी रुपयांची फसवणूक, विश्वासभंग, कटकारस्थान, फसवणूक, बनवाटगिरी आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप आरोप करण्यात आले आहेत. त्याच महिन्यात, भारतपेने दिल्ली उच्च न्यायालयात दिवाणी खटलाही दाखल केला, ज्यामध्ये ग्रोव्हर आणि त्याच्या कुटुंबाकडून विविध हेडअंतर्गत नुकसान भरपाईपोटी 88.67 कोटी रुपयांहून अधिक रक्कम वसूल करण्याची मागणी केली होती.

भारतपेने ग्रोव्हरला दिलेले प्रतिबंधित शेअर्स (1.4 टक्के) परत मिळावेत आणि त्याला कंपनीचे संस्थापक हे पद वापरण्यापासून रोखण्यासाठी सिंगापूरमध्ये लवादाकडे दावा दाखल केला होता. या वर्षी जानेवारीमध्ये कोलाडियाने डिसेंबर 2018मध्ये हस्तांतरित केलेले शेअर्स परत मिळविण्यासाठी ग्रोव्हरवर खटला दाखल केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -