घरदेश-विदेशमेंदी लावाल तर शाळेत प्रवेश नाही!!!

मेंदी लावाल तर शाळेत प्रवेश नाही!!!

Subscribe

गुजरात राज्यातील एका खाजगी शाळेने काढली नोटीस, हातावर मेंदी काढण्यास शाळेत प्रवेश नाही, पालकांनी तक्रार केल्यानंतर आदेश घेतले मागे.

शाळेत शिस्त पाळण्यासाठी काही गोष्टींवर शाळा प्रशासनाकडून बंदी घालण्यात येते. मात्र गुजरात येथील भरुचमध्ये असलेल्या एका खाजगी शाळेने मेंदीवर बंदी घातली आहे. मुलांच्या हातावर जर मेंदी आढळली तर त्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार नसल्याची नोटीस शाळा प्रशासनाने पाठवली. मात्र पालकांनी याचा विरोध केल्यानंतर नोटीस मागे घेतली. ख्रिश्चन ट्रस्टद्वारे चावलेल्या क्वीन एन्जेल्स शाळेत हा प्रकार घडला. मिळालेल्या माहिती नुसार या शाळेतील विद्यर्थीनींनी हाथावर मेंदी लावल्यामुळे त्यांना वर्गात जाण्यास अडवल्या गेले होते. मुलींच्या हतावरची मेंदी पूर्ण पणे दिसेनाशी झाल्यानंतरच मुलींना शाळेत पाठवण्याचे पालकांना सांगण्यात आले होते. पालकांची याचा विरोध केला असून या बाबत प्रसार माध्यमांतून बातम्या झळकल्यानंतर शाळेने या प्रकरणातून काढता पाय घेतला.

शाळेकडून मिळालेली प्रतिक्रिया

शाळा प्रशासनाच्या सिस्टर शैला यांनी सांगितले की, “अशा प्रकार यापुढे पुन्हा घडणार नाही. आम्ही सर्व सण साजरी करतो. विद्यार्थ्यांना त्यांच्या धर्माच्या आधारावर आम्ही भेदभाव करत नाही. शाळेच्या सुरुवाती पासून आम्ही हीच पद्धत पाळत आलो आहोत. आम्ही कोणालाही संस्पेंड केललं नाही.” पालकांनी शाळेबाहेर आंदोलन केल्यानंतर शाळा प्रशासनाने ही प्रतिक्रीया दिली आहे. शाळेकडून माफी मागीतल्यानंतर हे आंदोलन बंद करण्यात आली.

- Advertisement -

 

- Advertisement -

पूर्वी घडलेले प्रकार

यापूर्वीही विद्यार्थ्यांच्या कपड्यांवरून त्यांना शाळेत प्रवेश देण्यास नकारण्यात आले होते. ही घटना पुणे येथील एमआयटी शाळेत घडली होती. या शाळेतील विद्यर्थीनींच्या आंतवस्त्रांच्या रंगावरुन त्यांच्यावर बंदी घाण्यात आली होती. शाळेतील विद्यर्थींनीना फक्त पांढऱ्या आणि त्वचेच्या रंगाचेच आंतवस्त्र घालण्यासाठी सक्ती केली होती. मात्र नंतर मुलींच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्टीकरण शाळेद्वारे देण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -