घरCORONA UPDATECorona: कोरोनाला रोखणारा 'भीलवाडा मॉडेल'; लवकरच देशभरात होऊ शकतो लागू

Corona: कोरोनाला रोखणारा ‘भीलवाडा मॉडेल’; लवकरच देशभरात होऊ शकतो लागू

Subscribe

कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी देशभरात राजस्थानमधील भीलवाडा मॉडेल लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी हे संकेत दिले आहेत. मु

कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी देशभरात राजस्थानमधील भीलवाडा मॉडेल लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी हे संकेत दिले आहेत. मुख्य सचिव डी. बी. गुप्ता यांनी रविवारी राजस्थानचे मुख्यमंत्री असोक गहलोत यांच्या समिक्षा बैठकीत याबाबतची माहिती दिली. केंद्रीय कॅबिनेटच्या सचिवांनी मुख्य सचिवांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सवर याबाबत चर्चा केली होती. यामध्ये सचिव गौबा यांनी कोरोनापासून बचावाकरता भीलवाडामध्ये करण्यात आलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले. तसेच हे भीलवाडा मॉडेल संपूर्ण देशात लागू करायचे संकेतदेखील यावेळी दिले.

कोरोनाचा आकडा २७ वरच थांबला

भीलवाडामध्ये एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्यानंतर या जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरू लागला. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. मात्र नंतर हा आकडा २७ वर येऊन थांबला. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला की जिल्ह्यात कर्फ्यू लावून त्याच्या सीमा सील केल्या जात असे. जिल्हातील सर्व हॉस्पिटल आणि हॉटेल्सला कोरोना सेंटर्समध्ये बदलण्यात आले. लॉकडाऊनचे नियम पाळण्यात आले. तसेच घराघरात जाऊन स्क्रीनिंगदेखील करण्यात आले. लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व पटवून दिले. यामुळे भीलवाडा जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट झाली. भीलवाडामध्ये २० मार्च रोजीच्या कर्फ्यूच्या १५ दिवसानंतर ३ एप्रिलपासून ते १३ एप्रिलपर्यंत महाकर्फ्यू लावण्यात आला. तसेच तेथील डॉक्टर्स, प्रशासन आणि पोलीस या त्रिसूत्रीमुळे येथील कोरोनाचा प्रसार नियंत्रणात असल्याचे म्हटले जाते.

- Advertisement -

देशात कोरोनाची स्थिती चिंताजनक 

देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असतानाच आता कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्याही शंभरीपार गेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत १०९ जणांना या आजारामुळे मृत्यू झाला असून कोरोनाबाधितांची संख्या ही ४ हजारांवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रायलाने ही माहिती दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी एक पत्रक जारी केले असून यामधील आकडेवारीनुसार देशात आता ४ हजार ०६७ कोरोनाबाधित झाले आहेत. तर ३ हजार ६६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील २९१ रुग्ण बरे झाले असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा-

Coronavirus : मुंबईतले कोरोना कंटेनमेंट झोन आता गुगल मॅपवर!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -