करोनापासून बचाव कसा करावा सांगायला गेली आणि ट्रोल झाली

सध्या करोना व्हायरसपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी अनेकजण सोशल साईटवर संदेश देत आहेत. यात आता सेलिब्रिटीजही पुढे आले आहे. पण भोजपुरी अभिनेत्री राणी चटर्जी हीने करोनापासून बचाव करण्यासाठी काय करावे हे व्हिडीओमधून सांगताना स्वतच मास्क घरी विसरल्याचे सांगितले . यामुळे यूजर्स तिला ट्रोल करत आहेत.

या व्हिडीओमध्ये राणी मी आता मुंबई विमानतळावर असून कोलकाताला जात असल्याचे सांगत आहे. तसेच विमानतळ रिकामे असून येथे सर्वजण मास्क लावून फिरत असल्याचेही राणीने सांगितले. पण मी मात्र दोन दिवसांपासून मास्क वापरा म्हणून लोकांना सांगत असतानाच स्वत: घऱीच मास्क विसरले आहे. असे सांगितले. यानंतर यूजर्सनी राणीला ट्रोल करण्यास सुरुवात केली. मास्क वापर. करोना घेऊन येऊ नकोस. मास्क नसेल तर रुमाल वापर असा सल्ला देत अनेकांनी तिची खिल्लीही उडवली आहे.