घरताज्या घडामोडीBetul Accident : बैतूल-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बसचा भीषण अपघात, 18 जण जखमी

Betul Accident : बैतूल-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बसचा भीषण अपघात, 18 जण जखमी

Subscribe

मध्य प्रदेशातील बैतुल-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील मिलनपूर टोल प्लाझाजवळ मिनी बसचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या अपघातात 18 जण जखमी झाले असून, उपचारांसाठी जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मध्य प्रदेशातील बैतुल-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील मिलनपूर टोल प्लाझाजवळ मिनी बसचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या अपघातात 18 जण जखमी झाले असून, उपचारांसाठी जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. (bhopal a bus full of devotees overturned on the betul nagpur national highway in madhya pradesh 18 people were injured)

मिळालेल्या माहितीनुसार, सिहोर येथील कुबेरेश्वर धाम येथे आयोजित रुद्राक्ष महोत्सवात सहभागी होण्यासाठी नागपूर आणि पुलगाव येथून लोक मिनी बसने गेले होते. त्यानंतर रविवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास ही लोक सीहोरहून नागपूरला परतत होती. त्यावेळी मिलनपूर टोल प्लाझाजवळ कार वाचवण्याच्या प्रयत्नात मिनी बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उलटली.

- Advertisement -

या अपघातानंतर इतर प्रवाशांनी तातडीने रुग्णवाहिकेला कॉल केला. त्यानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आणि सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

18 जखमींची नावे

- Advertisement -

या जखमींमध्ये यश (20), लक्ष्मी पती प्रकाश (52), प्रगती पती अंकुश (30), सुनिता पती दिलीप (52), सोमा पती हनुमान (69), संदीप वडील दयाशंकर (40), नंदकिशोर वडील देवलाल (30), सीता देवी (62), सरिताचा पती उमेश केसरवानी (55), लखन लाल वडील मुन्ना लाल केसरवानी (62), उमेश केशरवानी (62), काजल केशरवानी (25), राणी (25), महेंद्र वडील सुकलप्रसाद (49), प्रकाश (49). 40), दिलीप केशरवानी (66), संतोष (45), आणि राजेश (45) वर्षे यांचा समावेश आहे.

दरम्यान, या अपघातात किरकोळ दुखापत झालेल्या प्रवाशांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. दुसरीकडे, गंभीर जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुणे-सोलापूर हायवेवर भीषण अपघात

पुणे-सोलापूर हायवेवर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार यात तीन वेगवेगळ्या वाहनांचा विचित्र अपघात घडला. यामध्ये एका कंटेनरने दुसऱ्या एका कंटेनरला आणि त्यानंतर दुसऱ्या दिशेने उभ्या असलेल्या एका चारचाकी गाडीला धडक दिली. यातील कंटेनर इतका भरधाव वेगात होता यामुळे रस्त्यावरील दुभाजक तोडून थेट दुसऱ्या दिशेच्या रस्त्यावर धडकला.


हेही वाचा – गुजरातमध्ये जाणता राजा नाटकावेळी…, पुण्यातील दौऱ्यात अमित शाह आठवणीत रमले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -