नर्मदा खोरे प्रकल्पाचा बोगदा कोसळून अपघात; ७ जणांना वाचवण्यात यश, अद्याप काही बेपत्ता

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कटनी जिल्ह्यातील स्लीमनाबाद येथील घडली आहे. स्लीमनाबाद येथील नर्मदा व्हॅली प्रकल्पांतर्गत नदीच्या उजव्या काठावर बोगदा बनवण्याचे काम सुरू होते. यावेळी नर्मदा नदीवरील बरगी धरण ते बाणसागरपर्यंत भूमिगत बोगद्याच्या कामादरम्यान माती खचल्याने त्याखाली 9 मजूर अडकून पडले.

bhopal narmada project tunnel collapses 9 laborers trappe under the pile mp shivraj singh chouhan
नर्मदा खोरे प्रकल्पाचा बोगदा कोसळुन अपघात; ७ जणांना वाचवण्यात यश, अद्याप काही बेपत्ता

मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी एक मोठा अपघात झाला आहे. कटनी जिल्ह्यातील नर्मदा खोरे प्रकल्पांतर्गत बांधण्यात असलेला भुयापी कोसळवा असून यात अनेर कामगार अडकले आहेत. बांधकाम सुरु असलेल्या या बोगद्यातील माती कोसळल्याने त्याखाली 9 मजूर अडकल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. दरम्यान स्थानिक प्रशासन आणि SDERF च्या टीमने आत्तापर्यंत 7 मजुरांची सुटका केली आहे. मात्र अद्याप 2 मजूर अडकल्याने त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

दरम्यान या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून सविस्तर माहिती घेतली आहे. तसेच घटनेसंदर्भात दु:ख व्यक्त करत जखमींना योग्य तातडीचे उपचार पुरवण्याच्या सूचना केल्या आहेत. याशिवाय सातत्याने फोनवर त्याकडून घटनेच्या अपडेट्स घेतल्या जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कटनी जिल्ह्यातील स्लीमनाबाद येथील घडली आहे. स्लीमनाबाद येथील नर्मदा व्हॅली प्रकल्पांतर्गत नदीच्या उजव्या काठावर बोगदा बनवण्याचे काम सुरू होते. यावेळी नर्मदा नदीवरील बरगी धरण ते बाणसागरपर्यंत भूमिगत बोगद्याच्या कामादरम्यान माती खचल्याने त्याखाली 9 मजूर अडकून पडले. शनिवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. आत्तापर्यंत 7 मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तर बोगद्यात अडकलेल्या इतर मजुरांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान जखमी झालेल्या मजुरांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


सर्वात मोठा बँकिंग घोटाळा! ABG शिपयार्डविरोधात FIR, 28 बँकांची 22,842 कोटींची फसवणूक