बीबीसीचा ‘तो’ माहितीपट पक्षपाती, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची तीव्र टीका

नवी दिल्ली : बीबीसीने अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर रीलीज केलेल्या माहितीपटावर परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे. हा माहितीपट म्हणजे, एका प्रचाराचा भाग असल्याचे आम्हाला वाटते. त्यात वस्तुनिष्ठता नाही. हा माहितीपट पक्षपाती असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले. हा माहितीपट भारतात प्रदर्शित केला गेला नाही, याकडे देखील अरिंदम बागची यांनी लक्ष वेधले.

‘इंडिया : द मोदी क्वेश्चन’ या दोन भागांच्या बीबीसी माहितीपटामध्ये पंतप्रधान मोदींवर गुजरात दंगलीतील आरोपींना वाचवण्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, या माहितीपटात नागरिकत्व कायदा (CAA) आणि जम्मू-काश्मीरमधील 370 हटवल्याचा संदर्भ देत सरकारवर टीका करण्यात आली आहे. यावर परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

हा एक प्रचाराचा प्रकार आहे. जी विशिष्ट बदनामीकारक कहाणी पुढे नेण्यासाठी डिझाइन केलेली आहे, असे आम्हाला वाटते. यात पूर्वग्रहदूषित, निष्पक्षतेचा अभाव आणि वसाहतवादी मानसिकता स्पष्टपणे दिसून येते. ब्रिटिश राजनैतिक अधिकाऱ्यांनी तपास आणि पडताळणी यासारख्या शब्दांचा वापर केल्याने एक विशेष मानसिकता असल्याचे जाणवते, असे परराष्ट्र मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बीबीसीने तयार केलेल्या माहितीपटाबाबत सांगितले.

ही कथा पुन्हा पसरवणाऱ्या एजन्सी आणि व्यक्तींचे प्रतिबिंब या हा चित्रपट किंवा माहितीपटात पाहायला मिळते. या माहितीपटात वस्तुस्थिती आणि विषयाबाबत तटस्थता नसल्याने या माहितीपटाशी निगडित लोक आणि संस्था यांचा एक विशेष प्रकारचा विचार असल्याचे दिसून येते, असेही अरिंदम बागची म्हणाले.

ऑस्ट्रेलियाचा निषेध
ऑस्ट्रेलियातील स्वामी नारायण मंदिर आणि आणखी एका हिंदू मंदिरावर अलकीडेच झालेल्या हल्ल्याचा अरिंदम बागची यांनी उल्लेख केला. ते म्हणाले की, ऑस्ट्रेलियात अलीकडे काही मंदिरांची तोडफोड झाल्याचे आम्हाला माहीत आहे. त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. ऑस्ट्रेलियन राजकारणी, आंतरराष्ट्रीय समुदाय नेते आणि तिथल्या धार्मिक संघटनांनीही याचा जाहीर निषेध केला आहे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – काही लोकांच्या बेईमानीमुळे अडीच वर्षे डबल इंजिनच्या सरकारला ब्रेक लागला; फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल