घरदेश-विदेशमजा-मस्तीत ज्यो बायडन पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणाले, मला तुमची...

मजा-मस्तीत ज्यो बायडन पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणाले, मला तुमची…

Subscribe

 

जपानः जपानमध्ये जी- ७ बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांच्यात झालेल्या संवादाची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. ज्यो बायडन, नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीस यांच्यात मजेशीर किस्सेही घडले. या चर्चेत ज्यो बायडन यांनी पंतप्रधान मोदी यांची थेट स्वाक्षरीच मागितली.

- Advertisement -

मोदी, बायडन आणि अल्बानीस यांच्यात चर्चा सुरु होती. बायडन यांनी सांगितले की, मोदीजी तुम्ही शाही भोजनासाठी अमेरिकेत येत आहात. पण मला खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांना या भोजनाला हजेरी लावायची आहे. अभिनेत्यांपासून अनेकांचे मला कॉल येत आहेत. तर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीस म्हणाले, सिडनी येथे २० हजार लोकांची क्षमता असलेले स्टेडिअम आहे. पण ते कोणत्याच कार्यक्रमाला पूर्ण क्षमतेने भरत नाही. पण गुजरातच्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये ९० हजार नागरिक स्वागतीसाठी आले होते. अल्बानीस यांच्या वक्तव्यावरुन जो बायडन हसत हसत म्हणाले, मोदीजी मला तुमची स्वाक्षरी हवी आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यात मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. तेथे त्यांच्यासाठी खास शाही भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातून सर्वांना आवर्जुन यायचं आहे. माझ्याकडचे सर्व तिकिट संपले आहेत. तुम्हाला ही थट्टा वाटत असेल. पण माझ्या सहकार्यांना विचारा. मला अशा लोकांचे फोन येत आहेत, ज्यांना ओळखतही नाही. अभिनेत्यांपासून नातेवाईकांपर्यंत सर्वांनाच कार्यक्रमासाठी यायचं आहे. तुम्ही खूप लोकप्रिय आहात, असे बायडन यांनी मोदींना सांगितले.

- Advertisement -

ज्यो बायडन म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येक गोष्टीवर प्रभाव टाकला आहे. आम्ही जी-७ बैठकीत काय करत आहोत. मोदींना जलवायूमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहे. इंडो-पैसिफिकमध्ये मोदींचा प्रभाव आहे.

पंतप्रधान मोदी येत्या मंगळवारी सिडनी येथील कार्यक्रमात ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यापारी नेत्यांसोबत बैठक करणार आहेत. भारतीय प्रवाशांसोबत मोदी संवाद साधणार आहेत. जून महिन्यात मोदी अमेरिका दौऱ्यावर आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -