नवी दिल्ली : भारताकडे यजमानपद असलेल्या जी-20 शिखर परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन भारतात येणार की नाही याकडे लक्ष लागले होते. मात्र, त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर ते भारताकडे रवाना झाले असून, आज सायंकाळी ते भारतात पोहचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे स्वागत करणार आहेत.(Biden left for India after testing negative for Corona; Modi welcome in the evening)
जी-20 शिखर परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे गुरुवारी त्यांच्या व्हाईट हाऊसमधून भारतासाठी रवाना झाले आहेत. शुक्रवारी म्हणजे आज सायंकाळी ते भारतात पोहचणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी ते दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. व्हाईट हाऊसने काढलेल्या एका प्रसिद्धी पत्रकानुसार, जर्मनी, भारत आणि वियतनाम या देशांचा ते तीन दिवस दौरा करणार असून, त्यामध्ये सर्वाधिक वेळ भारतात असणार आहेत.
भारताकडे येण्याच्या एका तासाआधीच आला निगेटिव्ह रिपोर्ट
व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, भारतात होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेला येण्याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आरोग्य केंद्रात जाऊन कोरोनाची चाचणी केली. त्यांच्या दिशा निर्देशनाचे ते पालन करणार आहेत. तर भारताकडे रवाना होण्याच्या एका तासाआधीच त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यांनतर ते भारताकडे रवाना झाल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा : Sanatan Dharma Row : उदयनिधी यांच्या श्रीमुखात मारण्यासाठी 10 लाखांचे बक्षीस!
जर्मनीत मुक्कामानंतर भारताकडे रवाना
व्हाऊट हाऊसच्या प्रसिद्धी पत्रकानुसार, अमेरिकेहून रवाना झाल्यानंतर जो बायडन शुक्रवारी जर्मनीच्या रैमस्टीनमध्ये थांबणार आहेत. त्यानंतर सायंकाळी भारतात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक करणार आहे. तर शनिवारी औपचारिक स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाला हजर राहून जी-20 च्या पहिल्या सत्रातील वन अर्थ आणि त्यानंतर वन फॅमिली या सत्राला उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा : India vs Bharat : देशाचे नाव बदलण्याची विनंती आल्यास….; UN ची महत्त्वपूर्ण टिप्पणी
डिनरचाही घेणार अस्वाद
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे जी-20 शिखर परिषदेमध्ये विविध कार्यक्रमाला हजर राहल्यानंतर ते परिषदेला उपस्थित असलेल्या प्रमुखांसह डिनरलाही उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी ते G-20 नेत्यांसोबत राजघाटावर जाणार आहेत. त्यानंतर ते नवी दिल्लीहून व्हिएतनामला जातील, जिथे ते कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस गुयेन फु ट्रॉंग यांची भेट घेतील.
पंतप्रधानासोबत करणारा विविध विषयावर चर्चा
पंतप्रधान मोदी आणि बायडेन यांच्या बैठकीत युक्रेन आणि हवामान बदलावर चर्चा होण्याची शक्यता कमी आहे. जी-20 च्या अजेंडा, आर्थिक सहकार्य आणि बहुपक्षीय गुंतवणूक, बहुपक्षीय विकास बँकांच्या सुधारणा आणि पुनर्रचना यावर दोघांमध्ये चर्चा होण्याची अपेक्षा आहे.