घरदेश-विदेशRussia-Ukraine War : युक्रेनच्या मदतीसाठी अमेरिकेने उघडला खजिना; जो बायडेन सरकारची 33...

Russia-Ukraine War : युक्रेनच्या मदतीसाठी अमेरिकेने उघडला खजिना; जो बायडेन सरकारची 33 अब्ज डॉलरला मंजुरी

Subscribe

रशियन लष्करी कारवाईचा सामना करत असलेल्या युक्रेनला मदत करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी काँग्रेसला अतिरिक्त 33 अब्ज डॉलर मंजूर करण्याचे सांगितले आहे. युक्रेनला मदत करण्यासाठी आणि रशियाला कमकुवत करण्यासाठी अमेरिता दीर्घकालीन योजनेवर काम करत आहे. दरम्यान अनेकदा बैठका होईनही रशिया आणि युक्रेनमधील गेल्या महिन्याभरापेक्षा अधिक काळापासून सुरु असलेले युद्ध तुर्तास थांबेल असे वाटत नाही.

बायडेन यांच्या ताज्या प्रस्तावावर, व्हाईट हाऊसने सांगितले की, युक्रेनला 20 अब्ज डॉलर्सहून अधिक लष्करी मदत आणि शेजारील देशांच्या संरक्षण प्रणालीला बळ देण्यासाठी पाच महिन्यांची मदत अपेक्षित आहे. तर अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांना 8.5 अब्ज डॉलर्स आर्थिक मदत आणि युद्धामुळे विस्तापित झालेल्या 5 लाख निर्वासितांसह नागरिकांना अन्न आणि मानवतावादी मदतीसाठी दिले जातील.

- Advertisement -

युक्रेनसाठीचे मदत पॅकेड काँग्रेसकडे विचारार्थ पाठवण्यात येईल. ही मदत युक्रेन आणि पाश्चात्य मित्र राष्ट्रांसाठी संरक्षण आणि आर्थिक मदतासाठी गेल्या महिन्याभरात मंजूर केलेल्या 13.6 अब्ज डॉलरच्या तुलनेने दुप्पट आहे, जी आता जवळपास संपत आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना केवळ त्यांच्या देशाच्या शेजारीच नव्हे तर त्यापलीकडेही नियंत्रण प्रस्थापित करण्याचे प्रयत्न थांबवण्यासाठी अमेरिका मदत करताना थकली नाही म्हणून ही मदत महत्त्वपूर्ण आहे.

- Advertisement -

बायडेन म्हणाले, “या लढ्याची किंमत कमी नाही, परंतु आक्रमकतेला बळी पडणे अधिक महाग होणार आहे. हा निधी लवकरात लवकर मंजूर होणे महत्वाचे आहे.”

युक्रेनच्या पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील प्रदेशांमध्ये लढाई तीव्र झाल्यामुळे आणि रशियाने पोलंड आणि बल्गेरिया या दोन नाटो भागीदारांना गॅस पुरवठा थांबवल्यामुळे वाढत्या आंतरराष्ट्रीय तणावामुळे युद्धाच्या नवव्या आठवड्यात अमेरिकेच्या अध्यक्षांची विनंती आली आहे. विशेष म्हणजे रशियाविरुद्ध लढण्यासाठी युक्रेनला मदत करण्याच्या मुद्द्याला काँग्रेसच्या दोन प्रमुख पक्षांचा पाठिंबा असल्याने हा प्रस्ताव मंजूर होईल, असे मानले जात आहे. मात्र, काँग्रेस आणि डेमोक्रॅट्ससंसद सदस्यत्यांना महामारीशी लढण्यासाठी अतिरिक्त अब्जावधी डॉलर्सची मंजुरी देखील हवी आहे, ज्यावर परिस्थिती अद्याप अस्पष्ट आहे.


ट्रम्प आणि न्यूयॉर्क पोस्ट ब्लॉक करणाऱ्या विजया गड्डेंवर एलॉन मस्कचा हल्लाबोल, कोण आहे ही महिला?

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -