घरदेश-विदेशइंदूरमधील मंदिर दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू, १९ जणांना वाचवले; सरकारकडून चौकशीचे आदेश

इंदूरमधील मंदिर दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू, १९ जणांना वाचवले; सरकारकडून चौकशीचे आदेश

Subscribe

इंदूर – मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये रामनवमीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली आहे. येथील श्री बेलेश्वर महादेव झुलेलेलाल मंदिरातील विहिरीवरील छत कोसळल्याने १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १९ लोकांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहे. इंदूर येथील स्नेह नगरजवळील पटेल नगर येथील श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात रामनवमीनिमित्त मोठ्या संख्येने लोक दर्शनासाठी आले होते. त्याचवेळी स्टेपवेलवरील छत अचानक कोसळले आणि सुमारे ३० हून अधिकजण विहिरीत पडले. या घटनेच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

सध्या जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही विहीर 40 फूट खोल असून, त्यावर लोखंडी जाळी होती. लोखंडी जाळीवर स्लॅब टाकून बांधकाम करण्यात आले. हवनाच्या वेळी विहिरीच्या छतावर अधिक लोक जमा झाल्याने जाळी तुटून हा अपघात झाला. अपघात घडताच तातडीने जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि इतर प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. इंदूरचे महापौर पुष्यमित्र भार्गव यांच्यासह सर्व एमआयसी सदस्य बैठक सोडून घटनास्थळी पोहोचले होते. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

- Advertisement -

अपघात घडल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. तेथील रस्ते अरुंद असल्याने बचावकार्यास अडचणी येत आहेत. रुग्णवाहिका नेण्यासही अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे विहिरीत पडलेल्या लोकांना बाहेर अत्यंत जिकरीने काढावे लागले. घटनास्थळीची स्थिती सध्या अत्यंत बिकट आहे. या घटनेत बळी गेलेल्या नातेवाईकांनी टाहो फोडला आहे. विहिरीत पडलेल्या महिला आणि मुलांसह १९ जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. तर, अन्य लोकांसाठी ऑक्सिजचना पुरवठा केला जात आहे. तर, काही लोक अजूनही विहिरीत अडकले असल्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -