घरदेश-विदेशअंतराळातून पृथ्वीवर येतेय मोठी अपत्ती; अवघे काहीच तास शिल्लक!

अंतराळातून पृथ्वीवर येतेय मोठी अपत्ती; अवघे काहीच तास शिल्लक!

Subscribe

या लघुग्रहांची गती 31 हजार 319 किमी / ताशी आहे. याच वेगाने हा लघुग्रह जर पृथ्वीवर आदळला तर मोठी त्सुनामी येण्याची शक्यता!

आकाशातील एक धोकादायक दृश्य पाहण्यासाठी सज्ज व्हा… कारण अंतराळातून पृथ्वीवर मोठी आपत्ती येणार असून त्याकरता अवघे काही तास शिल्लक आहेत. एकीकडे कोरोना सारख्या महामारीशी लढत असलेल्या जगासमोर मोठं, नवीन संकट येत असल्याने जगभरातील शास्त्रज्ञांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. जर दिशेत थोडासा जरी बदल झाला तर धोका अधिक वाढू शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेची अंतराळ संस्था नासातर्फे सुमारे दीड महिन्यांपूर्वी सांगण्यात आले होते की, एक मोठा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने वेगाने येणार आहे. यासह हा लघुग्रह पृथ्वीवरील सर्वात उंच असणाऱ्या एव्हरेस्ट पर्वतापेक्षा कितीतरी पटीने मोठा असणारा आहे, असे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

या लघुग्रहांची गती 31 हजार 319 किमी / ताशी आहे. याच वेगाने हा लघुग्रह जर पृथ्वीवर आदळला तर मोठी त्सुनामी येऊ शकते. तसेच ही आपत्ती बर्‍याच देशांचा नाश देखील करू शकते.

- Advertisement -

तसेच, नासाने असे देखील सांगितले आहे की, हा लघुग्रह पृथ्वीपासून सुमारे 62.90 लाख किलोमीटर अंतरावर जाणार असल्याने या लघुग्रहाला घाबरून जाण्याची गरज नाही. अंतराळ विज्ञानामध्ये हे अंतर जास्त नसले तरी ते कमी देखील नाही. काही वैज्ञानिकांनी हा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता देखील वर्तवली आहे.

या लघुग्रहाचे नाव 52768 (1998 OR 2) असून हा लघुग्रह 1998 मध्ये नासाने पहिल्यांदा पाहिला होता. त्याचा व्यास सुमारे 4 किलोमीटर आहे. हे लघुग्रह 29 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजून 26 मिनिटांनी पृथ्वीजवळून जाणार आहे. पृथ्वीपासून त्याचे अंतर सुमारे 62.90 लाख किलोमीटर असणार आहे.

आजच्या या घटनेनंतर पृथ्वीच्या दिशेने हा लघुग्रह 52768 (1998 OR 2) ची पुढील फेरी 18 मे 2031 च्या सुमारास मारू शकेल. त्यावेळी हा लघुग्रह 190 दशलक्ष किलोमीटरच्या अंतरावरून जाऊ शकते. खगोलशास्त्रज्ञांच्या मते, दर शंभर वर्षांनी असा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याच्या 50,000 शक्यता आहे. परंतु, कोणत्याही मार्गाने तो पृथ्वीच्या काठावरुन पुढे मार्गक्रमण करतो.


२९ एप्रिल रोजी जगाचा विनाश होणार! जाणून घ्या, व्हायरल व्हिडीओचे सत्य

एक प्रतिक्रिया

  1. चंद्र व पृथ्वी मधिल सरासरी अंतर ३,८४,००० कि.मी.आहे आणि हा लघुग्रह ६२,००,००० कि.मी.अंतरावरून जाणार आहे.उगाच सनसनाटी बातम्या देऊ नयेत.करोना विषाणू कमी आहे का?

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -