घरताज्या घडामोडी...आणि भरपार्टीत बिग बींना 'राजीव गांधी'च्या आठवणीने कोसळले रडू

…आणि भरपार्टीत बिग बींना ‘राजीव गांधी’च्या आठवणीने कोसळले रडू

Subscribe

एके काळी बिग बी अमिताभ बच्चन आणि गांधी कुटुंबीय यांचे जवळचे संबंध होते. तर दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी आणि अमिताभ बच्चन यांच्यात घट्ट मैत्रीचे संबंध होते. गंमतीत कधी कधी अमिताभ राजीव गांधीना भाईसाहब म्हणूनही संबोधत. या दोघांची मैत्री त्याकाळी राजकीय वर्तुळातच नाही तर बॉलीवूडमध्येही चर्चिले जायची. पण कालांतराने सगळं चित्र बदलले. पण अमिताभ यांच्या मनात मात्र राजीव गांधी कायम आदरस्थानी राहीले. हेच अधोरेखीत करणारा एक प्रसंग बॉलीवूड पार्टीत घडला आणि राजीव गांधीच्या आठवणीने अमिताभ ओक्साबोक्सी रडले होते

१९९२ साली अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी यांच्या ‘खुदा गवाह’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घातला होता. चित्रपटातील बादशाह खानच्या भूमिकेने अमिताभ यांना अभिनयाच्या सर्वोच्च पदावर नेलं होतं. सगळीकडे त्यांची चर्चा होती. नवी दिल्लीत चित्रपटाची पार्टी होती. बॉलीवूड, राजकारणातले अनेक मातब्बर या पार्टीत हजर
होते. खुदा गवाहच्या स्टार कास्ट सिलेक्शनपासून त्याच्या निर्मितीच्या प्रवासावर गप्पांचे फड रंगले होते. अमिताभही त्यावर भरभरून बोलत होते. त्यामुळे साहजिकच मीडियापासून पार्टीतल्या पाहुण्यांचे लक्ष त्यांच्यावरच केंद्रीत होते. याचदरम्यान, चित्रपटाच्या शूटींगवेळी राजीव गांधी यांनी आपल्याला कशी मदत केली हे सांगताना बिग बी फारच भावुक झाले. आपले मित्र राजीव गांधी यांची अनुपस्थिती त्यांना खटकली आणि अमिताभ यांच्या भावनांचा बांध फुटला आणि ते भरपार्टीत ओक्साबोक्सी रडू लागले.

- Advertisement -

आजही जेव्हा गांधी कुटुंबीयांचा विषय निघतो तेव्हाही राजीव गांधीच्या आठवणीने अमिताभ उदास होतात.राजीव गांधीच्या दोस्तीसाठी अमिताभ यांनी १९८४ साली राजकारणातही प्रवेश केला होता. पण त्यात त्यांना यश मिळाले नाही.
मात्र त्यानंतर गांधी कुटुंबीय व बच्चन यात अंतर आले. जे कधी कमी झालेच नाही. पण राजीव गांधींबरोबरची मैत्री मात्र अमिताभ यांनी आजही मनात जपून ठेवली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -