हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाची मोर्चेबांधणी; विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी

हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये भाजपा आणि काँग्रेसची अटीतटीची लढाई सुरू आहे. हिमाचलमध्ये काँग्रेस आघाडीवर असून भाजपा पिछाडीवर आहे. त्यामुळे पराभवाच्या दिशेने जाणाऱ्या भाजपाने मोर्चेबांधणी करायला सुरूवात केली आहे.

Vinod tawde and rahul gandhi

हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये भाजपा आणि काँग्रेसची अटीतटीची लढाई सुरू आहे. हिमाचलमध्ये काँग्रेस आघाडीवर असून भाजपा पिछाडीवर आहे. त्यामुळे पराभवाच्या दिशेने जाणाऱ्या भाजपाने मोर्चेबांधणी करायला सुरूवात केली आहे. भाजपाने विनोद तावडे यांच्याकडे हिमाचर प्रदेशची मोठी जबाबदारी सोपवल्याचे समजते. त्यानुसार विनोद तावडे हिमाचल प्रदेशमध्ये दाखल झाल्याचीही माहिती समोर येत आहे. (big battle in Himachal Pradesh preparation of Operation Lotus by BJP Vinod Tawde big responsibility)

सत्ता मिळवण्यासाठी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी संख्याबळाची जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाने पुढील मोर्चेबांधणी करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये आघाडी पिछाडीचा खेळ सुरू आहे. आताच्या आकडेवारीनुसार हिमाचलमध्ये काँग्रेस ३८ तर भाजपा २७ जागांवर आघाडीवर आहे. तर ३ जागांवर अपक्ष आघाडीवर आहेत. अशा परिस्थितीत त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येऊन, अपक्षांचे महत्त्व वाढण्याची शक्यता आहे.

गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण आज या दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी पार पडणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीनुसार सध्याचे निकाल पाहता हिमाचल प्रदेशमध्ये कॉंग्रेसला आमदार फुटीची भीती आहे. त्यामुळे मिळालेले संख्याबळ कायम ठेवण्यासाठी काँग्रेसही सावध झाली आहे. त्यानुसार, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी शिमल्यामध्ये दाखल झाल्या आहेत. तसेच, काँग्रेसच्या सर्व आमदारांना जयपूरला पाठवणार असल्याचे समजते. सध्याच्या निकालांनुसार, हिमाचलमध्ये भाजपाचे तीन बंडखोर आमदार आघाडीवर आहेत.

दरम्यान, हिमाचल प्रदेशमध्ये असलेली भाजपाची सत्ता काँग्रेस यंदा काबीज करेल, असे स्पष्ट चित्र दिसत आहे. मात्र आता भाजापाची मोर्चेबांधणी पाहता काँग्रेसचे आमदार फुटणार की, काँग्रेस आपली सत्ता स्थापन करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2017

हिमाचल प्रदेशमध्ये 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा विजयी झाला होता. हिमाचलमध्ये भाजपने 44 जागा जिंकल्या असून, काँग्रेसला 21 जागा मिळाल्या होत्या. तीन जागा इतर पक्षांनी जिंकल्या होत्या. या निवडणुकीत भाजपाने एकहाती सत्ता मिळवली होती.

हिमाचल प्रदेशमध्ये यावेळी मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. आतापर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदानाचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. 76 टक्के मतदान झाले होते. यापूर्वी 2017 च्या मागील विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 75.57 टक्के मतदान झाले होते.


हेही वाचा – शिंदे गटातील ‘त्या’ मंत्र्याच्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांना धमकीचे २ फोन?