घरदेश-विदेशभाजपाला मोठा धक्का; AIADMK ने सोडली साथ, कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून निर्णयाचे स्वागत

भाजपाला मोठा धक्का; AIADMK ने सोडली साथ, कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून निर्णयाचे स्वागत

Subscribe

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला मोठा धक्का बसला आहे. अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (AIADMK) ने सोमवारी (25 सप्टेंबर) भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सोबतची युती तोडण्याची घोषणा केली. यासंदर्भात पक्षाने बैठकीत ठराव मंजूर केल्याचे AIADMK उप-संयोजक केपी मुनुसामी यांनी सांगितले. पक्षाकडून घेतलेल्या या निर्णयानंतर कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून स्वागत करण्यात आले. (Big blow to BJP AIADMK pulls out decision welcomed by workers bursting firecrackers)

हेही वाचा – भर बैठकीत पंतप्रधान मोदी ‘साप’ कोणाला म्हणाले? माजी वित्त सचिवांच्या पुस्तकात खुलासा

- Advertisement -

AIADMK उप-संयोजक केपी मुनुसामी म्हणाले की, भाजपाचे प्रदेश नेतृत्व गेल्या एक वर्षापासून आमचे माजी नेते, आमचे सरचिटणीस ईपीएस आणि आमच्या कार्यकर्त्यांबद्दल सतत अनावश्यक टिप्पणी करत आहे. त्यामुळे आम्ही वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी स्वतंत्र आघाडी करणार आहे.

- Advertisement -

एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय पक्षाचे प्रमुख ईके पलानीस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली AIADMK मुख्यालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीत पक्षाने एकमताने एनडीएशी फारकत घेण्याचे आणि पुढील वर्षीच्या निवडणुकीत समविचारी पक्षांची आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही केपी मुनुसामी यांनी सांगतिले. AIADMK च्या बैठकीला पक्षाचे वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हा सचिव आणि आमदार आणि खासदार उपस्थित होते. पक्षाच्या या निर्णयानंतर मुख्यालयात फटाके फोडून स्वागत करण्यात आले.

हेही वाचा – ओवैसींनी राहुल गांधींना नव्हे तर, पंतप्रधान मोदींना आव्हान द्यावं; संजय राऊतांचा घणाघात

अन्नामलाई यांच्या वक्तव्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये तेढ

भाजपाचे राज्य नेतृत्व के अन्नामलाई गेल्या एक वर्षापासून AIADMK चे माजी नेते, सरचिटणीस, ईपीएस आणि कार्यकर्त्यांबद्दल सतत अनावश्यक टिप्पणी करत आहेत. त्यांनी अलीकडे AIADMK च्या धोरणांवर टीका करताना प्रसिद्ध द्रविड व्यक्तिमत्व दिवंगत सी एन अन्नादुराई तसेच दिवंगत मुख्यमंत्री जे जयललिता यांची बदनामी केली होती. त्यामुळे वारंवार होत असलेल्ला टीकेमुळे AIADMK नाराज होता. अण्णादुराई यांच्याबद्दलच्या अलीकडच्या विधानांमुळे दोन्ही पक्षांमध्ये तेढ निर्माण झाला आणि त्यानंतर AIADMK भाजपाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -