घरदेश-विदेशकाँग्रेसला मोठा धक्का, प्रचार समितीच्या प्रमुखपदाचा गुलाम नबी आझाद यांचा राजीनामा

काँग्रेसला मोठा धक्का, प्रचार समितीच्या प्रमुखपदाचा गुलाम नबी आझाद यांचा राजीनामा

Subscribe

पक्षात संघटनात्मक बदल होण्याकरता काँग्रेसच्या २३ नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिले होते, या नेत्यांमध्ये गुलाम नबी आझादसुद्ध होते. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझादर यांना जम्मू काश्मीरच्या प्रचार समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी काही तासांतच या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी नवी जबाबदारी स्विकारली नाही. तसेच, ते पक्षाविरोधात बंड पुकारणार असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Big blow to Congress, Gulam Nabi Azad resigns as head of campaign committee)

हेही वाचा – गोंदियात रेल्वेचा भीषण अपघात, एक डब्बा घसरल्याने 50 हून अधिक प्रवासी जखमी

- Advertisement -

गुलाम नबी आझाद हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून ते माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातही काम केलंय. तसेच, पक्षातील अनेक पदंही त्यांनी भूषवली आहेत. पक्षात संघटनात्मक बदल होण्याकरता काँग्रेसच्या २३ नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिले होते, या नेत्यांमध्ये गुलाम नबी आझादसुद्ध होते.

दरम्यान, मंगळवारी काँग्रेसने पक्षाची प्रचार समिती तयार केली. या समितीमध्ये ११ नेते असून तारिक हमीद कारा समितीचे उपाध्यक्ष तर जीएम सरुरी निमंत्रक आहेत. तर, समितीच्या प्रमुखपदी गुलाम नबी आझाद यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या समितीचे सदस्य असतात. मात्र, गुलाम नबी आझाद यांचा या समितीला विरोध आहे. त्यामुळे या समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती होताच त्यांनी पदाचा राजीनामा दिला.

- Advertisement -

हेही वाचा – ‘हर घर तिरंगा’ अभियानामुळे देशभक्तीची भावना अधिक दृढ, सरसंघचालक होसबळे यांचे प्रतिपादन

गुलाम नबी आझाद सध्या पक्षाच्या कार्यपद्धतीवर खुश नसल्याच्या चर्चा आहेत. तसेच, ते जेव्हा राज्यसभेमधून निवृत्त झाले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं भरपूर कौतुक केलं. त्यामुळे गुलाम नबी आझाद पक्ष बदलणार असल्याच्याही चर्चा आहेत. मोदींप्रमाणेच गुलाम नबी आझाद यांनीही मोदींचे कौतुक केले होते. त्यामुळे तेही बंडखोरीच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येतंय.

 

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -